‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.  नुकताच अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा दिमाखात पार पडला. तर आता या दोघांचं लग्न राजेशाही थाटात पद्धतीने संपन्न होत आहे. या लग्न सोहळ्याच्या शूटिंग सेटबद्दल त्या दोघांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाचं शूटिंग मुंबई किंवा ठाण्यात नाही तर कर्जतच्या एन. डी स्टुडिओमध्ये होत आहे. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा हा स्टुडिओ आहे. या लग्न सोहळ्यासाठी एन. डी स्टुडिओतील रॉयल पॅलेस बुक करण्यात आला आहे. तर आता एन. डी स्टुडिओमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव शिवानी आणि ऋषिकेश यांनी सांगितला.

आणखी वाचा : “आमच्या लग्नात खूप…” मालिकेतील हळदीच्या निमित्ताने शिवानी रांगोळेने सांगितली खऱ्या आयुष्यातील लग्नाची खास आठवण

एन.डी स्टुडिओतील रॉयल पॅलेसच्या या सेटबद्दल ‘लोकमत फिल्मी’शी बोलताना ऋषिकेश म्हणाला, “हे खूप सुंदर लोकेशन आहे. साखरपुड्याचं जसं ग्रँड होतं तसंच हेही खूप भव्य आणि दिमाखदार आहे. एन डी स्टुडिओमधील या पॅलेसमध्ये आपल्यावर राजवाड्यात आल्याचा खरोखरच फील जाणवत आहे. आम्ही खूप दमून-भागून, प्रवास करून इथे आलो होतो. पण ही जागा पाहिल्यावर आम्ही सगळेच खूप चार्ज झालो. हे लोकेशन पाहिल्यावर आमच्या सगळ्यांमधील उत्साह पुन्हा जागा झाला. हीच या जागेची ऊर्जा आहे आणि ती आम्हाला जाणवली त्यामुळे ती प्रेक्षकांनाही स्क्रीनवर बघताना नक्कीच जाणवेल.”

हेही वाचा : शिवानी रांगोळेने सांगितला कविता मेढेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “एकत्र सीन करताना…”

तर शिवानी म्हणाली, “नक्कीच. तुमचं शूटिंगचं लोकेशन कसं आहे, तेथील वातावरण कसं आहे यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भुवनेश्वरी आणि अधिपती यांच्या घरातील हे लग्न कार्य आहे आणि त्यामुळे ते तितकंच ग्रँड दिसण्याची गरज होती. लग्नाच्या निमित्ताने हा सगळा सेट खूप छान सजवण्यात आला आहे पण मुख्य नवरी मुलगी आणि नवरा मुलगा खुश नाहीये त्यामुळे ही गोष्ट लोकांना मालिका बघताना नक्कीच जाणवेल.” अक्षरा आणि अधिपती यांचा हा ग्रँड विवाहसोहळा १ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना संध्याकाळी ‘झी मराठी’वर बघता येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikavin changlach dhada serial to shoot in nitin desai nd studio shivani rangole and hrishikesh shelar share their experience rnv