Tula Shikvin Changalach Dhada Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये भुवनेश्वरीमुळे वाद निर्माण झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी चारुलताचं रुप घेऊन सूर्यवंशींच्या घरात राहत होती. पण, तिचं कट-कारस्थान अक्षराने वेळीच ओळखून सर्वांना सावध केलं. याशिवाय चारुहास आणि भुवनेश्वरीचं लग्न देखील अक्षरा मोडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चारुहासशी लग्न करून सूर्यवंशींच्या घरची सत्ता मिळवणं हा भुवनेश्वरीचा एकमेव उद्देश असतो. मात्र, अक्षराने तिचे डावपेच वेळीच उधळून लावल्यामुळे त्या दोघांचं लग्न मोडतं. अक्षरा भर मांडवात येऊन भुवनेश्वरीचं सत्य चारुहासला सांगते. यावेळी अधिपती पुन्हा एकदा आपल्या आईच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. अधिपतीने फसवणूक केल्याचं समोर येताच अक्षरा प्रचंड भावुक होते. त्यामुळे ती काहीही करुन भुवनेश्वरीचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड करायचा असा निश्चय करते.

हेही वाचा : “दोन वर्षांत तीनच चित्रपट हिट होत असतील तर कसं होणार?” मराठी सिनेविश्वाबद्दल शरद केळकरने विचारले रोखठोक प्रश्न; उपायही सुचवले

अक्षरा यासाठी तुरुंगात जाऊन बजरंगला भेटते. बज्या मास्तरीण बाईंसमोर भुवनेश्वरीच्या सगळं काही विरोधात बोलतो. “आता हे सगळं तू अधिपतींसमोर सांग” असं अक्षरा त्याला सांगते, आणि घरी घेऊन येते. पण, प्रत्यक्षात अधिपतीसमोर आल्यावर बज्या पलटतो. “अक्षराच्या दबावाखाली येऊन मी भुवनेश्वरी मॅडमबद्दल खोटं सांगतोय” असं तो सांगतो. यामुळे अक्षरा सगळ्या कुटुंबासमोर तोंडावर पडते.

भुवनेश्वरीला केवळ सत्ता हवीये, तिचं कोणावरही प्रेम नाहीये हे अक्षरा अधिपतीला पटवून देण्याचा प्रयत्न करते. पण, तिचा नवरा काही केल्या ऐकून घेण्यास तयार नसतो. माझ्या आईसाहेबांच्या पाठिशी मी कायम आहे असं सांगत अधिपती अक्षराच्या विरोधात बोलू लागतो. हे सगळं पाहून ती प्रचंड संतापते.

हेही वाचा : EMI भरण्यासाठी नावडते चित्रपट केले; विवेक ओबेरॉय म्हणाला, “यशाचं मोजमाप वाढदिवसाला येणाऱ्या पुष्पगुच्छांच्या संख्येवरून…”

अधिपती म्हणतो, “अजून काही काळ आपण एकत्र राहिलो ना…तर एकमेकांचा जीव घेऊ.” नवऱ्याचं हे टोकाचं म्हणणं ऐकून अक्षरा म्हणते, “हे काय बोलताय तुम्ही अधिपती…” पुढे, तो म्हणतो, “कुणीतरी गेलं पाहिजे…” यावर अक्षरा घर सोडून जाण्याचा निर्णय अधिपतीला सांगते.

एकीकडे अक्षरा-अधिपतीमध्ये वाद होत असताना दुसरीकडे दुर्गेश्वरी भुवनेश्वरीला म्हणते, “तिने तुझं लग्न मोडलंय…त्यामुळे, आता तू तिचं लग्न मोडं.” भुवनेश्वरी-दुर्गेश्वरी यांच्या नव्या डावामुळे अक्षरा-अधिपतीचा संसार पुन्हा एकदा मोडकळीस आला आहे. आता या दोघांचा संसार खरंच मोडणार की, यांना एकत्र आणण्यासाठी चारुहास पावलं उचलणार… या गोष्टी मालिकेच्या ( Tula Shikvin Changalach Dhada ) आगामी भागांमध्ये स्पष्ट होतील.