Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा सासरचं घर सोडून माहेरी परत आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. भुवनेश्वरीबरोबरच्या रोजच्या वादाला कंटाळून अक्षरा घर सोडण्याचा निर्णय घेते. अधिपती आपल्या आईच्या सगळ्या चुकांवर पांघरुन घालतोय हे पाहून अक्षराला संताप अनावर होतो. त्यामुळेच तिने घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. चारुहास आपल्या सुनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतो पण, तरीही मास्तरीण बाई आपल्या मतावर ठाम असते.

अक्षरा घराबाहेर गेल्यामुळे भुवनेश्वरी मात्र प्रचंड आनंदी असते. कारण, आपल्या विरोधात जाणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करून सूर्यवंशींच्या घरावर साम्राज्य गाजवायचं असा तिचा हट्ट असतो. अक्षरा घराबाहेर पडल्यावर मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे अक्षरा लवकरच आई होणार आहे.

Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mika Singh angry because Anant Ambani did not gift him 2 crore
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
Nora Fatehi Attend Wedding Function Ratnagiri
कोकणी पाहुणचार, आहेरात साडी अन्…; बॉलीवूड अभिनेत्री सहकाऱ्याच्या लग्नासाठी पोहोचली रत्नागिरीत! सर्वत्र होतंय कौतुक
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
Bigg Boss चा बंगला! सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; दाखवली पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “कष्टाचं…”
Rang Maza Vegla Fame Actress sonali salunkhe wedding
रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! धुळ्यात थाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो पाहिलेत का?
tula shikvin changalach dhada zee marathi serial bhuvaneshwari re enters in the show
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा : Bigg Boss चा बंगला! सूरज चव्हाणच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात; दाखवली पहिली झलक, नेटकरी म्हणाले, “कष्टाचं…”

एकीकडे अक्षरा गरोदर असते तर, दुसरीकडे भुवनेश्वरी तिला शाळेतल्या नोकरीवरून काढून टाकण्याची तयारी करत असते. भुवनेश्वरी आपल्याला शाळेतून बेदखल करणार असल्याचं समजताच या सासू-सुनेत वाद होतात. मी अजिबात शाळा सोडून कुठेही जाणार नाही असं मास्तरीण बाई सासूला ठणकावून सांगते. या सगळ्या घडामोडी घडत असताना अक्षराची आई प्रेग्नन्सीबद्दल अधिपतीला सांग असा सल्ला लेकीला देते. पण, ती या गोष्टीला तयार नसते.

“आताच घराबाहेर पडल्यावर जर लगेच प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं, तर अधिपतीला असं नको वाटायला की, बाळाचं कारण सांगत मी पुन्हा घरी जायला बघतेय.” असं मत अक्षरा आपल्या आई-बाबांसमोर मांडते.

आता लवकरच अक्षरा आई होणार असल्याचा खुलासा भुवनेश्वरीसमोर होणार आहे. त्यामुळे आता काही केल्या अक्षराला घरात घ्यायचं नाही, नाहीतर आपल्याला घराबाहेर जायची वेळ येईल याची खात्री भुवनेश्वरीला असते. त्यामुळे येत्या काळात अक्षराचा बंदोबस्त करण्यासाठी भुवनेश्वरी मोठा डाव खेळणार आहे.

हेही वाचा : अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”

अक्षरा गरोदर असल्याचे रिपोर्ट्स लवकरच भुवनेश्वरीसमोर येणार आहेत. एकीकडे अक्षरा बाळाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करत असते. तर, दुसरीकडे भुवनेश्वरी म्हणते, “आता आम्हाला यांची कायमची शांती करावी लागेल.”

दरम्यान, आता येत्या काळात मालिकेत काय ट्विस्ट येणार, अक्षरा या संकटावर मात कशी करेल, अधिपतीला तो बाबा होणार आहे हे सत्य कधी समजेल? या सगळ्या गोष्टींचा लवकरच उलगडा करण्यात येईल. याशिवाय २३ डिसेंबरपासून आता ही मालिका रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जाते.

Story img Loader