Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षराला मानसिक रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मास्तरीण बाईंच्या मनात चारुलताच भुवनेश्वरी असल्याची शंका निर्माण झाली आहे. खरंतर अक्षराला वेडं ठरवण्यासाठी तिच्या सासूने रचलेलं हे खूप मोठं कारस्थान आहे मात्र, सध्याच्या परिस्थितीत अक्षरावर सूर्यवंशी कुटुंबातील कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये.
अक्षराला काही महिन्यांपूर्वी बाजारात चारुलता दिसते. अधिपतीची खरी आई असल्याने ती या बाईंना सूर्यवंशींच्या घरी आणते. मात्र, हळुहळू तिला चारुलताच्या वागण्यामागे भुवनेश्वरीच्या सगळ्या कृती दिसू लागतात. या काळात दुर्गेश्वरीला माफ केल्याने चारुलताच भुवनेश्वरी असल्याची मोठी हिंट अक्षराला मिळते. तसेच या दोघींच्या कानात सारख्याच कुड्या ( लहान कानातले ) अक्षरा पाहते. सुनेला सुर्यवंशी कुटुंबीयांसमोर वेडं ठरवायचं असा डाव भुवनेश्वरीचा ( Tula Shikvin Changlach Dhada ) असतो.
हेही वाचा : “महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
अक्षराला अधिपती वाचवेल का?
अक्षराला तिचं म्हणणं सिद्ध करता येत नाही परिणामी तिला उपचारांची गरज आहे असं सांगून चारुलता ( खरी भुवनेश्वरी ) तिची रवानगी रुग्णालयात करते. बळजबरीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं. यामध्ये अधिपती सुद्धा काहीच बोलू शकत नाही. एकीकडे घरात लग्नाची तयारी सुरू होते. तर, दुसरीकडे अक्षराला जीवे मारण्याचा प्लॅन शिजतो.
अक्षरावर हल्ला करण्यासाठी भुवनेश्वरी तिचा माणूस रुग्णालयात पाठवते. एवढ्यात बायकोची विचारपूस करण्यासाठी अधिपती नर्सला फोन करतो. विचित्र माणसाला हॉस्पिटलच्या खोलीत आलेलं पाहून अक्षरा प्रचंड घाबरून ‘हेल्प हेल्प’ ओरडत आणि मोठमोठ्याने किंचाळत असते. पण, नर्स अधिपतीला अक्षरा सूर्यवंशी झोपल्या आहेत असं सांगते. फोनवर मास्तरीण बाईंच्या किंचाळण्याचा आवाज येताच अधिपती सगळं सोडून बायकोला भेटण्यासाठी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतो. ( Tula Shikvin Changlach Dhada )
आता संकटात सापडलेल्या अक्षराला अधिपती कसा वाचवणार की, हा फक्त सुनेला आणखी वेडं ठरवण्यासाठी भुवनेश्वरीचा नवीन डाव आहे हे येत्या भागात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changlach Dhada ) या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये शिवानी रांगोळे, हृषिकेश शेलार, कविता मेढेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री ८ वाजता प्रसारित केली जाते.