Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या चारुहास आणि चारुलता ( भुवनेश्वरी ) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरू आहे. अक्षरा काही महिन्यांपूर्वी मालिकेत अधिपतीच्या खऱ्या आईला म्हणजेच चारुलताला घेऊन आल्याचं पाहायला मिळालं. पण, ही चारुलता नसून भुवनेश्वरीच आहे हे तिला काही दिवसांत लक्षात येतं. घरातल्यांसमोर सासूचा हा मोठा डाव अक्षरा उघड करते. पण, भुवनेश्वरी मोठ्या हुशारीने सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर सुनेला खोटं सिद्ध करून वेडं ठरवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अक्षराची रवानगी रुग्णालयात करण्यात आलेली आहे. इथून बाहेर पडण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत असते. पण, काही केल्या अक्षराला ते शक्य होत नाही. कारण, भुवनेश्वरीने तिला अडकवून चारुहासशी लग्न करण्याचा डाव आखलेला असतो. तिला त्रास देण्यासाठी रुग्णालयात बजरंग येतो. पण, नर्स, डॉक्टर या सगळ्यांना भुवनेश्वरीने आधीच पैसे दिलेले असतात. अधिपतीला हे सगळेजण इथे कोणीच आलेलं नाहीये असं सांगतात.

हेही वाचा : Video: आणखी एका नव्या मालिकेची घोषणा, दमदार प्रोमो होतोय व्हायरल; ‘ही’ अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

अधिपती सुद्धा अक्षरावर विश्वास ठेवण्यास तयार नसतो. शेवटी मास्तरीण बाई आपल्या मैत्रिणीकडून मदतीसाठी मोबाइल मागून घेते. अक्षरा हा मोबाइल उशीच्या कव्हरमध्ये लवपून ठेवते. एवढ्यात तिच्या वॉर्डमध्ये बजरंगची एन्ट्री होती. त्याची चाहूल लागताच अक्षरा लगेच फळांच्या मागे मोबाइल दडवून ठेवते. अक्षरा आणि बजरंगमध्ये झालेला संवाद यामध्ये रेकॉर्ड होत असतो. बजरंगला या सगळ्या कारस्थानात भुवनेश्वरी मदत करतेय हे सत्य अक्षराला वदवून घ्यायचं असतं…आता यात तिला यश मिळणार की नाही हे आगामी भागांमध्ये स्पष्ट होईल.

अक्षरा करणार व्हिडीओ रेकॉर्डिंग ( Tula Shikvin Changalach Dhada )

दुसरीकडे, सूर्यवंशींच्या घरी चारुहास आणि चारुलताच्या लग्नाची तयारी होत असते. चंचलाला ही चारुलता नसून तिची मावशी भुवनेश्वरी असल्याचं माहिती असतं. त्यामुळे चंचला तिला मावशी अशी हाक मारते इतक्यात अधिपती तिच्या खोलीत येतो ते पाहताच भुवनेश्वरी पुन्हा एकदा सावध होते. आता तिचं हे खरं रुप सर्वांसमोर केव्हा येणार आणि विशेषत: अधिपती अक्षरावर विश्वास कधी ठेवेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हेही वाचा : “तुझी सर्वात मोठी चिअरलीडर…”, लाडक्या लेकाच्या वाढदिवशी जिनिलीया देशमुखची खास पोस्ट; म्हणाली, “मला आई होऊन…”

याशिवाय आता येत्या काही भागात अक्षरा भुवनेश्वरीला अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ देखील घ्यायला लावणार आहे. आता अक्षरामुळे चारुहास आणि तिचं ( खोटी चारुलता ) लग्न थांबणार की, सुनेला खोटं सिद्ध करण्यात पुन्हा एकदा भुवनेश्वरी यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं (Tula Shikvin Changalach Dhada ) ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changalach dhada akshara new strategy to find out bhuvneshwari truth watch promo sva 00