Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत भुवनेश्वरी, अक्षरा घराबाहेर राहत असल्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. भुवनेश्वरी, अधिपती समोर स्वतःची चांगली छवी बनवून ठेवण्यासाठी अक्षराशी तिच्या घरी बोलायला जाते आणि तिथून आल्यावर ती अक्षराने न बोललेल्या गोष्टी अधिपतीला सांगून त्याचे कान भरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे अक्षराला आई-बाबा समजावतात की, तिने लवकरात लवकर अधिपतीला भेटून गरोदर असल्याची बातमी द्यावी. त्यावर अक्षरा ठरवते की, संक्रांतीच्या दिवशी स्वत: जाऊन अधिपतीला भेटायचं. ती अधिपतीसाठी छान गिफ्ट तयार करते. अधिपतीने पण तिच्यासाठी छान साडी आणि हलव्याचे दागिने घेतले आहेत. दुर्गेश्वरी हे सर्व पाहून अधिपतीच्या साडीची पिशवी बदलते. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अक्षराला घरी घेऊन जायचं म्हणून अधिपती अक्षराच्या घरी येतो. पण घरात नेमकी इरा आहे. हीच संधी साधून इरा अक्षराविरुद्ध अधपतीला सगळी चुकीची माहिती देते. तो तिच्या बहिणीला ( इराला ) विचारतो, “ठीक आहेत ना मास्तरीण बाई?” यावर इरा त्याला सांगते, “ताई सकाळपासून बाहेर गेलीये. तिचा मित्र आलाय ना परदेशातून… मित्र आल्यापासून एकदम खूश आहे.”

दुसरीकडे भुवनेश्वरीही अक्षराला दारातच अडवते. “घर सोडलं तसं नातं पण विसरा” असं जेव्हा सासू अक्षराला सांगते, तेव्हा अक्षरा तिला चांगलाच पलटवार देते. “तुम्ही दिलात का तुमच्या नात्याला अग्नी, तुमचं तर लग्नही झालेलं नाही, तरी तुम्ही हे घर आजही सोडलेलं नाहीये आणि नातंही तोडलेलं नाही. माझं म्हणाल तर, देवा ब्राम्हणाच्या साक्षीने आमचं लग्न झालंय. त्यामुळे हे घर माझं आहे.” असं ठाम उत्तर अक्षरा भुवनेश्वरीला देते.  पलटवार बघून भुवनेश्वरी अक्षरावर हात उचलते. याच आठवड्यात अक्षराच्या जुन्या मित्राचीही एन्ट्री होणार आहे आणि ही व्यक्ती आल्यानंतर अक्षरा-अधिपतीमधला गैरसमज आणखी वाढत जाणार आहे.

कोण आहे हा अक्षराचा नवीन मित्र? अधिपतीला कळेल का की तो बाबा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changalach dhada akshara old friend will enter in the show watch promo sva 00