Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून खरी भुवनेश्वरी नेमकी कोण, ती कुठे आहे याचा शोध सुरू असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मालिकेत काही महिन्यांआधी अधिपतीची खरी आई चारुलताची एन्ट्री झाली होती. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो.

अधिपती केवळ भुवनेश्वरीलाच आपली आई मानत असतो. त्यामुळे तो चारुलतापासून कायम अंतर राखून वागत असतो. एकीकडे या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे दुर्गेश्वरीची कारस्थानं सुरूच असतात. मात्र, दुर्गेश्वरीला शिक्षा करण्यापेक्षा तिला माफ करणं चारुलता जास्त योग्य समजते. तिच्या या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसतो.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
tula shikvin changalach dhada zee marathi serial bhuvaneshwari re enters in the show
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हेही वाचा : मृणाल कुलकर्णी झळकणार ‘पैठणी’ चित्रपटात! सोबतीला असेल Bigg Boss 18 मधली ‘ही’ अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

अक्षराला सुद्धा चारुलताच्या वागण्याबाबत शंका येते. ती अधिपतीला सांगते, “आईंनी मावशींना एवढ्या सहज माफ केलं, मला त्यांच्या माफ करण्यात सहजता जाणवली. आईंना मावशींबरोबर काहीतरी जवळीक जाणवली असणार” हळुहळू घरात वावरणारी व्यक्ती कोण आहे? भुवनेश्वरी की चारुलता… याबद्दल अक्षराच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागतो. अशातच तिला बाजारात फिरताना भुवनेश्वरीची झलक दिसते. मात्र, अक्षरा मागे जाताच भुवनेश्वरी डोळ्यासमोरून दिसेनाशी होते. या सगळ्यात सासूबाईंच्या कानातल्यांकडे अक्षराचं नीट लक्ष जातं आणि ती घरी ( Tula Shikvin Changalach Dhada ) येते.

सूर्यवंशीच्या घरात चारुलता आणि चारुहास यांचं पुन्हा लग्न लावण्याचा घाट घातलेला असतो. चारुलताशी संवाद साधताना अक्षराला बाजारात भुवनेश्वरीच्या कानात पाहिलेले अगदी सेम टू सेम तसेच कानातले चारुलताच्या कानात दिसतात. यामुळे तिला मोठा धक्का बसतो. या कानातल्यांमुळे दोघी वेगळ्या नसून चारुलताच भुवनेश्वरी आहे अशी खात्री अक्षराची होते.

हेही वाचा : “घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…

एवढे दिवस सूर्यवंशींच्या घरी भुवनेश्वरीच चारुलता होऊन वावरत असते. अक्षराची शंका खरी ठरल्यामुळे ती घडल्याप्रकाराची माहिती अधिपतीला देते. तसेच भुवनेश्वरीच खोटी चारुलता म्हणून वावरत असल्याने काही करून त्यांचं बाबांबरोबर लग्न होता कामा नये. आपण हे लग्न थांबवलं पाहिजे असं अक्षरा अधिपतीला सांगते.

Tula Shikvin Changalach Dhada : प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो

आता चारुलता आणि चारुहासचं लग्न अक्षरा थांबवू शकेल का..? याचा उलगडा ९ नोव्हेंबरच्या विशेष भागात होणार आहे. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changalach Dhada ) ही मालिका दररोज रात्री ८ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.

Story img Loader