Tula Shikvin Changalach Dhada Fame Shivani Rangole And Kavita Medhekar : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामधलं प्रत्येक पात्र आता घराघरांत लोकप्रिय झालं आहे. या मालिकेतील सासू-सुनेची जुगलबंदी प्रेक्षकांना विशेष भावते. भुवनेश्वरी आणि अक्षरा या दोघीही मालिकेत सतत भांडत असतात. आता तर, चारुलताच्या रुपातील भुवनेश्वरीने सुनेविरोधात मोठा कट रचला आहे. अर्थात हे सगळं Reel आयुष्य आहे. पण, खऱ्या आयुष्यात गोष्टी फारच वेगळ्या आहेत.

मालिकेत जरी भुवनेश्वरी-अक्षरा सतत एकमेकींशी वाद घालताना दिसल्या तरी, खऱ्या आयुष्यात कविता आणि शिवानी यांची मैत्री खूपच घट्ट आहे. भुवनेश्वरी हे पात्र अभिनेत्री कविता लाड-मेढेकर साकारत आहेत. तर, अक्षराच्या भूमिकेतून शिवानी रांगोळेने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. ऑफस्क्रीन या दोघींमध्ये खूप छान मैत्री आहे. नुकताच कविता मेढेकरांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्ताने शिवानी खास पोस्ट शेअर करत तिच्या लाडक्या ताईंना शुभेच्छा दिल्या होत्या.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sharad Pawar , Ajit Pawar, Sharad Pawar latest news,
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा : “निवडणूक प्रचार भाषणांना सेन्सॉर का नाही?” ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचा सवाल; म्हणाले, “एक सुजाण नागरिक…”

कविता मेढेकरांनी शिवानीला दिलं खास गिफ्ट

आता या ऑनस्क्रीन सासू-सुना आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. ती गोष्ट म्हणजे कविता मेढेकरांनी त्यांच्या लाडक्या शिवानीला खास गिफ्ट दिलं आहे. गिफ्ट म्हणून भुवनेश्वरीने मास्तरीण बाईंना लाइट लेव्हेंडर रंगाचा ड्रेस दिला आहे. या ड्रेसवर पांढऱ्या फुलांची डिझाइन करण्यात आली आहे.

कविता मेढेकरांचं गिफ्ट पाहून शिवानी निश्चितच भारावून गेली आहे. ती लिहिते, “हा रंग मला सूर्यास्ताची आठवण करून देतो. पुस्तकांच्या वाचनासाठी घालवलेला आरामदायी वेळ, संथ सकाळ आणि आरामदायी अशा सर्व गोष्टींची चाहूल या छानशा रंगामुळे येते. या इतक्या सुंदर ड्रेससाठी खूप खूप थँक्यू कविता ताई!” अर्थात कविता मेढेकरांनी शिवानीला छानसा ड्रेस गिफ्ट दिल्याचं कॅप्शन आणि फोटो पाहून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : ‘एक मोटा हाथी…’, म्हणत निक्कीने उडवली खिल्ली! वजन काट्यावर उभं राहून आर्याने स्वीकारलं ‘हे’ चॅलेंज; नेमकं काय घडलं?

हेही वाचा : ‘जेठालाल’ सोडणार ‘तारक मेहता…’ शो? असित मोदींशी भांडणाच्या वृत्तांवर दिलीप जोशी म्हणाले, “मला खूप वाईट…”

शिवानी रांगोळेने नव्या ड्रेससाठी आभार मानल्यावर या फोटोंवर कमेंट करत कविता मेढेकरांनी “थँक्यू Pretty गर्ल” असं म्हटलं आहे. याशिवाय अक्षराच्या आणखी काही चाहत्यांनी सुद्धा या फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Story img Loader