‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय आहे. यामधील अक्षरा-अधिपतीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. टीआरपीसाठी मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असंच एक रंजक वळण ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार आहे आणि मालिकेत लवकरच एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षरा अधिपतीला गाण्याची शिकवणी लावण्याविषयी भुवनेश्वरीला सांगते. खरंतर सुरुवातीला ही संकल्पना भुवनेश्वरीला अजिबात पटत नाही. परंतु, एक नवीन डाव साधून आता पुन्हा एकदा भुवनेश्वरी अक्षरा-अधिपतीच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. अधिपतीला गाण्याची शिकवणी देण्यासाठी भुवनेश्वरी एका नव्या गायिकेची निवड करते.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली, “निमिष आणि माझ्या आई-वडिलांची भेट…”

अक्षराने या बाई कोण आहेत अशी विचारपूस केल्यावर भुवनेश्वरी सांगते, “या अधिपतीला गाणं शिकवतील. यांचा आवाज त्यांच्या सरगम या नावाप्रमाणे अतिशय गोड आहे. याआधी त्यांनी बरेच गाण्याचे कार्यक्रम केले आहेत.” मालिकेत या सरगमचं पात्र अभिनेत्री सानिया चौधरी साकारणार आहे.

हेही वाचा : ‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से

सानिया चौधरीने यापूर्वी ‘दार उघड बये’, ‘सांग तू आहे का?’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. यापूर्वी ‘सांग तू आहे का?’ मालिकेत सुद्धा सानियाने शिवानी रांगोळेबरोबर ऑनस्क्रीन काम केलेलं आहे. त्यामुळे या दोघींना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहून प्रेक्षकांना आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, अधिपतीने सरगमला मास्तरीणबाई म्हटल्यावर अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तिला काय बोलावं हे सुचत नाही कारण, याआधी अधिपती फक्त अक्षरालाच मास्तरीणबाई अशी हाक मारत होता. त्यामुळे सरगमच्या येण्याने अधिपती-अक्षराच्या नात्यात काय बदल होणार? दोघे आणखी दूर जाणार? की वेगळे होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changalach dhada marathi serial saaniya chaudhari will enters in the show as adhipati new singing teacher sva 00