काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी या पात्रांनी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच मालिकेत अधिपती आणि अक्षराचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर दोघांमध्ये लग्नानंतरचे खेळ खेळण्यात आले. मग भुवनेश्वरीने अक्षराच नाव बदलण्याचा घाट घातला. पण ते अक्षराला मान्य नव्हतं. त्यामुळे अधिपती अक्षराच नाव बदलणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं होतं.

हेही वाचा – नुसरत भरुचाप्रमाणे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेत्री अडकली असती इस्रायलमध्ये, पण…

आजच्या एपिसोडमध्ये अधिपतीने बायकोचं नाव काय ठेवलं? याचा खुलासा झाला आहे. अधिपतीने अक्षराच नाव दुसरं तिसरं कोणतं ठेवलं नसून अक्षराच ठेवलं आहे. याचा प्रोमो ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अधिपतने तांदळात अक्षराच नाव लिहीलेलं दिसत आहे. यावर भुवनेश्वरी अधिपतीला म्हणते की, हे काय अधिपती, आम्ही तुम्हाला नवीन नाव लिहायला सांगितलं होतं जुनं नाही? यावर अधिपती म्हणतो की, हेच नाव चांगलं आहे.

हेही वाचा – Video: इस्रायल-पॅलेस्टाईनच्या युद्धावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत…”

हेही वाचा – Video: शर्मिष्ठा राऊतचे ‘हे’ शब्द ऐकताच स्वप्नील जोशी झाला थक्क; मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हे शब्द भाषेमधून काढून टाका”

अधिपतीने घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. “एक नंबर अधिपती”, “मला वाटलंच अधिपती अक्षराच लिहिणार”, “एकच नंबर नाद खुळा”, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada adhipati change name akshara pps