‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची लाडकी होत चालली आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा असून दररोज नवीन काहीतरी घडताना दिसत आहे. आता ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

‘झी मराठी वाहिनी’ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षराला अधिपतीची आई म्हणजेच चारुलता दिसल्याचे पाहायला मिळाले आहे. अक्षरा बाजारात असून तिथे तिला भुवनेश्वरी दिसते. ती तिचा पाठलाग करते आणि जेव्हा भेट होते, तेव्हा ती भुवनेश्वरी नसून चारुलता असल्याचे समजते.

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Tula Shikvin Changalach Dhada New Promo
भुवनेश्वरीला कळणार अक्षराचं मोठं गुपित! सुनेबद्दलची ‘ती’ बातमी ऐकून सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार…; पाहा प्रोमो
Tula Shikvin Changalach Dhada Director new business
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या दिग्दर्शकाने नव्या वर्षात दिली आनंदाची बातमी! सुरू केला ‘हा’ व्यवसाय, अक्षराने दिल्या शुभेच्छा
Muramba
Video: जीव देण्यासाठी निघालेल्या अक्षयला माहीमुळे मिळणार जगण्याची नवी उमेद; पाहा ‘मुरांबा’ मालिकेत नेमकं काय घडणार?

मालिकेमध्ये नवीन वळण

प्रोमोमध्ये दिसत आहे की, अक्षरा एका महिलेला पाहते आणि म्हणते, या ताईंना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. या भुवनेश्वरी मॅडम तर नाहीत ना? मला खात्री करायला हवी, असे म्हणत ती पाठलाग करते आणि समोर भुवनेश्वरीला पाहून तिला आनंद होतो. ती म्हणते, भुवनेश्वरी मॅडम, इतके दिवस कुठे होतात तुम्ही? चला, घरी जाऊयात. असे म्हणून ती घरी जाण्यासाठी वळते. मात्र, तिच्यासमोरची महिला तिला म्हणते की, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी भुवनेश्वरी नाही तर चारुलता आहे. यानंतर अक्षराला धक्का बसल्याचे दिसत आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

आता हा प्रोमो समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चारुलता ही अधिपतीची जन्मदात्री आहे. चारुलता आणि भुवनेश्वरी एकमेकांसारख्या दिसतात, त्यामुळे अधिपती भुवनेश्वरीलाच आपली आई मानतो.

दरम्यान, मालिकेत दाखवल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच अक्षरा आणि अधिपती हनिमूनसाठी फुकेतला गेले होते. त्यावेळी भुवनेश्वरी आणि अधिपतीचे वडील यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले होते. या भांडणानंतर अधिपतीच्या वडिलांनी भुवनेश्वरीला घराबाहेर काढले होते, तेव्हापासून ती घरी परतली नाही.

हेही वाचा: Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने पायावर काढला नवा टॅटू, पाहा व्हिडीओ

जेव्हा अक्षरा आणि अधिपती सुट्ट्यांवरून परत घरी येतात, त्यावेळी अधिपतीला भुवनेश्वरी घरात नसल्याचे समजते. तेव्हापासून सर्व जण भुवनेश्वरीचा शोध घेत आहेत. मात्र, ती कुठेही सापडत नसल्याने सर्व चिंता करत होते. आता या सगळ्यात भुवनेश्वरीच्या जागी चारुलता अक्षरासमोर आल्याने मालिकेत कोणते नवे वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader