Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या नवरात्रीचा सीक्वेन्स सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच मालिकेत अधिपतीची खरी आई चारुलताची एन्ट्री झाली. आपल्या पत्नीच्या पुन्हा येण्याने चारुहासला प्रचंड आनंद होतो पण, दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी घरात नसल्याने उदास होतो. त्याने अद्याप चारुलताचा आई म्हणून स्वीकार केलेला नाही. या चौघांचे अंतर्गत वाद सुरू असताना दुसरीकडे दुर्गेश्वरी, चंचला यांचं नवनवीन डाव आखून अक्षराची आणि चारुलताची कोंडी करण्याचं काम देखील सुरू असतं.

आता मालिकेत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे. चारुहास आणि चारुलता दोघेही पारंपरिक गुजराती पद्धतीचा पोशाख करून दांडिया खेळणार आहेत. स्टेजवर दांडिया खेळणाऱ्या सासू-सासऱ्यांकडे अक्षरा मोठ्या आनंदाने पाहत असते. एवढ्यात तिचं लक्ष खालच्या स्टेजकडे जातं. चारुहास आणि चारुलता (Tula Shikvin Changlach Dhada) ज्या स्टेजवर दांडिया खेळत असतात, तो खालून हलत असल्याचं अक्षरा पाहते.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी आधी दिलेला नकार, मग घडलं असं काही…; प्राजक्ता माळीने स्वत: केला खुलासा, कसा बदलला निर्णय?

अधिपती करणार आई-बाबांचं रक्षण

अक्षरा, चारुहास- चारुलताचा जीव धोक्यात असल्याचं पाहते आणि लगेच याबद्दल अधिपतीला सावध करते. सुरुवातीला अधिपती आई-बाबांकडे पाहण्यास तयार नसतो. मात्र, त्यानंतर अक्षरा त्याला स्टेज हलतोय असं सांगते. हे पाहून अधिपती कसलाच विचार न करता आपल्या आई-बाबांच्या रक्षणासाठी पुढे सरसावतो.

अधिपती आणि अक्षरा दोघे मिळून स्टेज हलू नये यासाठी रंगमंचाकडे धावत जातात. आई-बाबांचं रक्षण करण्यासाठी दोघेही स्टेजच्या खाली जाऊन आधार देतात. अक्षरा वेळीच सावध झाल्याने चंचलाचा प्लॅन पुन्हा एकदा अयशस्वी ठरणार आहे. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा हा विशेष भाग उद्या ( १७ ऑक्टोबर ) रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला सर्वात मोठा पुरावा! चैतन्यने दिली साक्षीबद्दलची हिंट, आता कोर्टात काय घडणार? पाहा प्रोमो

तुला शिकवीन चांगलाच धडा (Tula Shikvin Changlach Dhada )

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changlach Dhada ) या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये शिवानी रांगोळे, कविता लाड-मेढेकर, स्वप्नील राजशेखर आणि हृषिकेश शेलार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.