Akshara Adhipati Honeymoon Marathi Serial : छोट्या पडद्यावरच्या ऑनस्क्रीन जोड्यांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सध्याच्या घडीला ‘झी मराठी वाहिनी’वरील अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा हे पात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे तर, अधिपती हे पात्र अभिनेता ऋषिकेश शेलार साकारत आहे. हे दोघंही सध्या हनिमूनसाठी थायलंडला गेल्याचा सीक्वेन्स मालिकेत चालू आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा ही सर्वसामान्य घरातील मुलगी असते. ती शाळेत शिक्षिका असते. अशातच श्रीमंत घरचा अधिपती या अक्षराच्या प्रेमात पडतो. या दोघांचं मनाविरुद्ध लग्न होतं. पण, कालांतराने अधिपती माणूस म्हणून खूपच चांगला असल्याची जाणीव अक्षराला होते. काही दिवसांपूर्वीच अक्षराने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली अधिपतीसमोर दिली. यानंतर भुवनेश्वरीने या दोघांना त्यांचं प्रेम सिद्ध करून दाखवण्यासाठी घराबाहेर काढलं होतं. एकीकडे भुनेश्वरी दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते, तर दुसरीकडे चारुहास अक्षरा-अधिपतीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतो.

Shocking video of wall collapsed on car man decision saved damage viral video on social media
योग्य निर्णय वेळेवर घेतला की त्रास कमी होतो! भिंत कोसळणार इतक्यात कारमध्ये बसला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Paaru
Video: संक्रातीच्या मुहुर्तावर सारंग-सावलीचे नाते फुलणार तर पारूवर येणार नवीन संकट, पाहा प्रोमो
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO
Tula Shikvin Changalach Dhada New Promo
भुवनेश्वरीला कळणार अक्षराचं मोठं गुपित! सुनेबद्दलची ‘ती’ बातमी ऐकून सासूच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार…; पाहा प्रोमो
Shocking Photo a fish came out by tearing open the stomach of a bird flying in the sky
अविश्वसनीय! आकाशात उडत्या पक्षाचे पोट फाडून बाहेर आला मासा; ‘हा’ PHOTO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा : Video : जोडी नंबर १! रितेश देशमुखने बायकोसह शेअर केला मजेशीर व्हिडीओ! नेटकरी म्हणाले, “वहिनी दादांचं…”

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत येणार ट्विस्ट

चारुहास दोन्ही मुलांच्या आनंदासाठी त्यांना परदेशात फिरायला पाठवण्याचा निर्णय घेतो. सध्या अक्षरा-अधिपती ( Akshara Adhipati ) फुकेतला प्रचंड मजा करत आहेत. याचे व्हिडीओ, फोटो व मालिकेचे नवे प्रोमो सर्वत्र व्हायरल होत आहेत. याशिवाय परदेशातील संस्कृती, वातावरण तसेच खाद्यसंस्कृतीचं दर्शन यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील घडत आहे.

‘झी मराठी वाहिनी’ने नुकत्याच शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये अधिपती व अक्षरा फुकेतच्या बाजारात हातात हात घालून फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षरा – अधिपती अनोळखी शहरांत एकमेकांबरोबर वेळ घालवत असतानाच मालितकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : नवीन होस्ट असणार रितेश देशमुख! ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही…

zee
अक्षरा-अधिपती ( Akshara Adhipati ) फोटो सौजन्य : झी मराठी वाहिनी

अक्षरा-अधिपतीच्या ( Akshara Adhipati ) मागमोग दुर्गेश्वरी सुद्धा फुकेतला पोहोचली आहे. दुर्गा तिचा नेहमीचा लूक बदलून परदेशात गेली आहे. निळ्या रंगाचा फ्रॉक, गॉगल, लाल केस असा लूक करून दुर्गेश्वरी गुपचूप अक्षरा-अधिपतीवर लक्ष ठेवून असते. एका झाडामागून ती दोघांवर लक्ष ठेवून असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दुर्गा ही सगळी माहिती ती भुवनेश्वरीपर्यंत पोहोचवणार की त्याआधीच अक्षरा-अधिपतीच्या नात्यात मिठाचा खडा टाकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader