Tula Shikvin Changlach Dhada Marathi Serial : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या चारुलता अनेक वर्षांनी सूर्यवंशी कुटुंबीयांच्या घरी परतल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अक्षरा-अधिपती फुकेतवरून आल्यापासून भुवनेश्वरी घरातून गायब झालेली असते. सूर्यवंशी कुटुंबीय तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात परंतु, ती कुठेही सापडत नाही. अशातच अक्षराला एके दिवशी बाजारात अचानक भुवनेश्वरीसारखी हुबेहूब दिसणारी बाई दिसते. मात्र, ही बाई स्वत:ची ओळख चारुलता अशी करून देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चारुलताचं नाव ऐकून अक्षराला काहीसा धक्का बसतो. मात्र, कालांतराने अक्षरा या चारुलताला सूर्यवंशी कुटुंबीयांच्या घरी घेऊन जाते. अनेक वर्षांनी आपल्या घरी बायको आल्याचं पाहून चारुहास प्रचंड आनंदी होतो. याशिवाय चारुलता सूनेची देखील अतिशय खंबीरपणे बाजू घेत असल्याचं प्रेक्षकांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे.

हेही वाचा : Video : “ए नासके…”, म्हणत वैभव निक्कीशी भिडला; आक्षेपार्ह शब्द वापरत दोघांमध्ये टोकाचे वाद; पाहा प्रोमो

सूर्यवंशींच्या घरी यंदा मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. बाळकृष्णाची पूजा करताना चारुलता आणि अक्षरा एकत्र पाळणा गात मनोभावे पूजा करतात. यानंतर त्यांच्या घरी आलेल्या बायका अक्षराच्या मातृत्वावरून प्रश्न उपस्थित करतात. यावर मात्र चारुलता चांगलीच भडकते आणि या बायकांना बाहेरचा रस्ता दाखवते. आता येत्या भागात अधिपती दहीहंडी फोडत असल्याचं पाहायला मिळणार आहे.

अधिपती दहीहंडीवर चढतो पण, चंचलाने आधीच त्याला खाली पाडण्याची योजना बनवलेली असते. दहीहंडीच्या गटातील एक माणसाशी चंचलाने हातमिळवणी केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा माणूस मुद्दाम खांदा सरकवतो आणि वरच्या थरावर उभ्या असलेल्या गोविंदाचा तोल जातो यामुळे दहीहंडीचे सगळे थर कोसळतात. सुदैवाने अधिपती वरच्या दोरीचा आधार घेऊन लटकून उभा राहतो. मात्र, त्याला काय करावं हे सुचत नसतं.

हेही वाचा : Video: आजपासून सुरू होणार तुळजाचा लग्नसोहळा, सूर्याने दिलं आमंत्रण; पण तुळजा कोणाशी लग्नगाठ बांधणार सिद्धार्थ की सत्यजितशी?

( Tula Shikvin Changlach Dhada ) फोटो सौजन्य : झी मराठी

अक्षरा वाचवणार नवऱ्याचा जीव

अक्षरा, चारुलता, चारुहास सगळेच अधिपतीची अवस्था पाहून खूप घाबरतात. शेवटी अक्षरा नवऱ्याला वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता थेट शिडी आणते. मोठ्या जिद्दीने एवढी उंच शिडी चढून ती अधिपतीपर्यंत पोहोचते. यानंतर दोघे मिळून हंडी फोडत असल्याचं ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changlach Dhada ) मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changlach Dhada ) या मालिकेच्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २९ ऑगस्ट म्हणजेच येत्या गुरुवारी हा विशेष भाग टीव्हीवर प्रक्षेपित केला जाणार आहे.