मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गौतमी-स्वानंद, मुग्धा-प्रथमेश, सुरुची-पियुष या जोडप्यांपाठोपाठ आता छोट्या पडद्यावरची आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या तिच्या मेहंदी सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अभिनेत्री रुता काळे घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने अक्षराच्या बहिणीची म्हणजेच इराची भूमिका साकारली आहे. सध्या रुताच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी खास अभिनेत्री अनुजा साठेने देखील हजेरी लावली होती.
हेही वाचा : “…तर २ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी; म्हणाला, “बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल…”
रुताला नोव्हेंबर महिन्यात तिचा बॉयफ्रेंड अभिषेक लोकनरने फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं. आता लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या अभिनेत्रीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा होणारा पती अभिषेक हा मराठी सिनेविश्वात दिग्दर्शक म्हणून काम पाहतो. रुताने काम केलेल्या पंधरवडा व अनवट या चित्रपटांचं दिग्दर्शन अभिषेकने केलेलं आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/01/image_2f4f62.png?w=335)
हेही वाचा : मातृत्व, सरोगेट मदर अन्…; प्रथमेश परबच्या ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, रुताने यापूर्वी ‘गोठ’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. सध्या लग्नासाठी तिने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून ब्रेक घेतला आहे. आता अभिनेत्रीच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.