‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे(Shivani Rangole) प्रेक्षकांची लाडकी आहे. या मालिकेत तिने अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारलेली आहे. मालिकेतील भूमिकेमुळे, ट्विस्टमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री आता मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळे पती व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत त्यांचे कपल गोल्स काय आहेत, यावर वक्तव्य केले आहे. याबरोबरच त्यांची ओळख कशी झाली, ते प्रेमात कधी पडले, त्यांनी एकमेकांना डेट करायला कधी सुरुवात केली, यावरही त्यांनी वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही आता जसे आहोत…

विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळे यांनी नुकतीच ‘सर्व काही’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवानी व विराजसला विचारण्यात आले की तुमचे कपल गोल्स काय आहेत? यावर दोघांनीही म्हटले, “आम्ही आता जसे आहोत, तसेच भविष्यात राहायचं. म्हणजे यामध्ये फार काही बदल नको. कारण जे चाललंय ते छान आहे. आताचा झोन आम्हाला आवडतोय.” पुढे शिवानीने म्हटले, “विराजस म्हटला तसं भांडण हा आधारस्तंभ आहे, त्यामुळे चांगली भांडणं करायची.” व्यावसायिकदृष्ट्या काय ध्येय आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्रीने म्हटले, “यावर्षी तरी एकत्र काम करायचं आहे. आमच्या प्रवासाची नाटकाने सुरुवात झाली, तर नाटकात काम करायला अगदीच आवडेल. सिनेमातही एकत्र काम करायला आवडेल.”

तुमचे कुटुंब कधी सुरू करणार, यावर उत्तर देताना शिवानीने म्हटले, “इतक्या लवकर नाही.” पुढे अभिनेत्रीने म्हटले, “मला घरच्यांना वेळ द्यायचा आहे, कारण आमचं असं होतं की आम्ही दोघं मुंबईत असतो. आमचं कुटुंब येऊन-जाऊन मुंबईत असतं. आमचे आई-बाबा, सासू-सासरे हे जास्तीत जास्त पुण्यात असतात. आजी आहेत, त्यामुळे मला त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे. मला मालिकेमुळे जमत नाही. विराजसलासुद्धा लिखाणाच्या कामामुळे वेळ देणं जमत नाही”, असे म्हणत घरच्यांना वेळ देण्याचे ध्येय असल्याचे शिवानी रांगोळेने म्हटले.

विराजस हा लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करतो. त्याने काही मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून कामही केले आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील भूमिकेने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. त्याची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले होते. ३ मे २०२२ ला त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.