Tula Shikvin Changlach Dhada Fame Virisha Naik Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चंचलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने लवकरच लग्न करणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर चंचलाचं लग्न केव्हा होणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला आहे. तिच्या लग्नसोहळ्यातील इनसाइड फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चंचलाची भूमिका अभिनेत्री विरीशा नाईक साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मेहंदी, हळद पार पडल्यावर आज विरीशा आणि प्रशांत लग्नबंधनात अडकले आहेत. या सोहळ्यातील काही फोटो त्यांच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा : Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
विरीशा आणि प्रशांत यापैकी एका फोटोत लग्न लागताना पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. यावेळी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी तर, प्रशांतने पांढरी शेरवानी, तसेच आकाशी रंगाचं धोतर आणि डोक्याला त्याच रंगाचा फेटा बांधल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसरा फोटो या जोडप्याच्या रिसेप्शनचा आहे. यामध्ये दोघेही इंडो-वेस्टर्न लूकमध्ये तयार झाले आहेत. संपूर्ण कलाविश्वातून प्रशांत आणि विरीशावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
विरीशाचा पती सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचं नाव आहे प्रशांत निगडे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि नाट्य निर्माता म्हणून प्रशांत ओळखला जातो. यापूर्वी त्याने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘स्वाभिमान’ मालिकेत ‘बबन’ ही भूमिका साकारली होती. सध्या तो ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत ‘रॉकेट’ची भूमिका साकारत आहे.
हेही वाचा : Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
प्रशांत आणि विरीशा यांनी एका नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ नाटकात दोघंही नवरा-बायकोची भूमिका साकारत आहेत. आता ही रील जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. प्रशांत आणि विरीशावर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.