‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. गेल्या महिन्यात या मालिकेत अक्षरा-अधिपतीचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अक्षरा ही शाळेत शिक्षिका असते, तर अधिपती हा गर्भश्रीमंतीत वाढलेला मुलगा या मास्तरीणबाईंच्या प्रेमात पडतो. या दोघांच्या अनोख्या प्रेमकहाणीवर या मालिकेचं कथानक आधारलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेत अधिपतीचं अक्षरावर प्रचंड प्रेम असल्याचं दाखवण्यात आलंय याउलट अक्षराने केवळ तडतोड म्हणून हे लग्न केलेलं आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीत अधिपतीची आई भुवनेश्वरी सर्वात मोठा अडथळा ठरत आहेत. मालिकेत कविता मेढेकर यांनी भुवनेश्वरीची दमदार भूमिका साकारली आहे. तसेच अक्षराच्या भूमिकेत प्रेक्षकांना अभिनेत्री शिवानी रांगोळे पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या शूटिंगमध्ये सध्या शिवानी प्रचंड व्यग्र आहे. अशातच तिने वेळात वेळ काढून इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं.

हेही वाचा : Amruta Khanvilkar Birthday: मुंबईचा जन्म पण वडिलांच्या ‘त्या’ निर्णयामुळे पुणेकर झाली अमृता खानविलकर, वाचा तिचा अभिनयसृष्टीतील प्रवास

शिवानीला ‘आस्क मी सेशन’मध्ये एका नेटकऱ्याने, तुम्ही आणि अधिपती लग्नानंतर फिरायला कुठे जाणार आहात? मालिकेत असा कोणता एपिसोड आम्हाला पाहायला मिळणार आहे का? असा प्रश्न विचारला. मालिकेतील पुढील ट्विस्ट जाणून घेण्यासाठी अभिनेत्रीला असा हटके प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अभिनेत्रीने “देखते रहो…”, असं उत्तर देत, पुढे तिने ‘मी काहीही सांगणार नाही हे’ असं दर्शवणारा इमोजी जोडला आहे.

हेही वाचा : लाडक्या बायकोला २३ दिवस २३ गिफ्ट्स! अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त पती हिमांशू मल्होत्राची खास पोस्ट; म्हणाला…

शिवानी रांगोळे

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात या मालिकेचा वाहिनीवरील सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून गौरव करण्यात आला. याशिवाय अभिनेत्री शिवानी रांगोळेला सर्वोत्कृष्ट जोडी, नायिका, लक्षवेधी चेहरा असे तीन पुरस्कार मिळाले आहेत.