‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची डोक्यावर घेतलं आहे. मग ती मुख्य भूमिका असो किंवा मध्यवर्ती भूमिका असो. प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली आहे. अशी एक भूमिका म्हणजे दुर्गेश्वरी. अभिनेत्री दीप्ती सोनावणे हिने दुर्गेश्वरी ही खलनायिका साकारली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून खऱ्या अर्थाने दीप्ती घराघरात पोहोचली. या मालिकेतही तिने ‘चंदा’ ही खलनायिका साकारली होती. पण या खलनायिकेच्या भूमिकेमुळे दीप्तीला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात एक भयानक अनुभव आला होता.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानला दिलंय ‘हे’ भन्नाट नाव; जाणून घ्या

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
radhika deshpande
“त्या व्यक्तीने मला…”, मराठी अभिनेत्रीबरोबर १६ व्या वर्षी घडलेली धक्कादायक घटना; म्हणाली, “मी त्याच्या कानाखाली दिली”

सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा-अधिपतीचा साखरपुडा सप्ताह रंगला आहे. याचनिमित्ताने दीप्तीने ‘राजश्री मराठी’ या  एंटरटेन्मेंट मीडियाबरोबर संवाद साधला. तेव्हा तिने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आलेल्या तो भयानक अनुभव सांगितला.

हेही वाचा – ‘रमा राघव’ या मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

ती म्हणाली की, “झी मराठीने मला पहिल्यांदा काम करण्याची संधी दिली. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत तुम्ही मला ‘चंदा’ या भूमिकेत यापूर्वी पाहिलं असेल. अजूनही लोक मला ‘चंदा’ या भूमिकेतच ओळखतात. पण मी त्यांना म्हणते की, आता बाबांनो मी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील दुर्गेश्वरी आहे. त्यामुळे तुम्ही मला दुर्गेश्वरी असंच म्हणत जा. पण चाहते म्हणतात, नाही ‘चंदा’ खूप गोड होती. एक चंदाच्या बाबतीतला किस्सा सांगेन. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील अंजली म्हणजेच अक्षया आणि माझी ऑफस्क्रीन घट्ट मैत्री आहे. तर आम्हाला एकेदिवशी वीकऑफ होता म्हणून आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलो होतो. त्यावेळेस अक्षयाने तोंडला स्कार्फ बांधला आणि गॉगल वगैरे घातला होता. मी म्हटलं, मला जीन्स-टॉपमध्ये कोण ओळखणार नाही. पण तसं नाही झालं.”

हेही वाचा – अभिनेत्री मीरा जोशी झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम

पुढे दीप्ती म्हणाली की, “त्यावेळेस मागून एक म्हातारी आली. तिने माझ्या मानेवर साटकन लावली. क्षणभर मला डोळ्यासमोर अंधारी आली. आता माझ्याबरोबर या महालक्ष्मीच्या मंदिरात हे काय झालं? हे असं मला वाटत होतं. मी मागे पाहिलं तर त्या आजीने माझी गचांडी वगैरे पकडून कोल्हापूरी शिव्या द्यायला सुरू केलं. तू आता तरी त्या गायकवाडांचं घर सोड, त्या अंजलीला आतातरी सोड, राणा-अंजलीमध्ये येऊ नको. बास की आता, तू पाठराखीण होतीस, पाठराखीण सारखी राहा. हे सगळं मी ऐकलं. माझा हातही त्या आजीने पकडला होता. ती मला सोडतच नव्हती.” असा भयानक अनुभव दीप्तीला आला होता.