‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकेत नवं वळणं आलं आहे. मास्तरीन बाई आणि अधिपतीचा साखरपुडा आता मोठ्या थाटामाटात पाहायला मिळणार आहे. ४ सप्टेंबरपासून आठवडाभर अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अशातच अधिपतीनं सेटवरील एक किस्सा सांगितला आहे.
सध्या अक्षरा आणि अधिपती साखरपुडा सोहळ्याच्या निमित्तानं विविध एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधत आहेत. अशाप्रकारे ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना ऋषिकेशनं शिवानीबाबत एक पोलखोल केली. दोघांना विचारलं गेलं होतं की, ‘सर्वात जास्त कोण चिडत?’ यावर शिवानी बोलली की, “आम्ही दोघे तसेच आहोत. पण एवढे ही नाही.” त्यानंतर ऋषिकेश म्हणाला की, “हिची एक गोष्ट सांगतो. हिला राग आला की, खूप रडू येतं. राग आल्यावर ती एका क्षणात बोलता बोलता रडते. आता हे आम्हाला माहित झाल्यामुळे आम्हाला तिच वाईट पण वाटत. पर्वाच असा प्रसंग झाला. आम्हाला यावर हसू सुद्धा येत. ही आता बहुतेक रडणार हा, असं वाटत असतानाच ती पुढच्या सेकंदाला रडते. मग आम्ही तिला हसत हसत समजावतो. बोलून मग सगळं शांत होतं.”
हेही वाचा – “तरुण राहण्यासाठी गोळ्या खातोय”, क्रांती रेडकरनं अभिजीत पानसेंबरोबर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा – “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”
त्यानंतर दोघांना विचारलं जातं की, ‘जर दोघं ट्रेनमध्ये गेलात आणि तिथे कोणाबरोबर तरी वाद झाले. तर यामध्ये जिंकून दोघांपैकी बाहेर कोण येईल.’ शिवानी बोलते की, “हा (ऋषिकेश). कारण मी रडणार ना.” हे ऐकून पुढे ऋषिकेश म्हणतो, “अरे हा. हीच रडणं पाहून ती लढाई पुढे होणारच नाही. तिकडेच स्थगित होईल.”