छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेतील अक्षरा, अधिपती आणि भुवनेश्वरी या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजपासून मालिकेत अक्षरा-अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह पाहायला मिळणार आहे. अशातच मालिकेतील भुवनेश्वरी म्हणजेच अभिनेत्री कविता मेढेकर यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याच्या निमित्तानं प्रशांत दामलेंची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत होणार एन्ट्री? कविता मेढेकर म्हणाल्या…

अक्षरा-अधिपतीच्या सारखपुड्या निमित्तानं मालिकेतील कलाकार मंडळी विविध एंटरटेन्मेंट माध्यमांशी बोलताना दिसतं आहेत. अशाच प्रकारे कविता मेढेकर यांनी ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधान म्हणाली, “ठाण्यावरून….”

त्या म्हणाल्या की, “एखाद पात्र कसं लोकांपर्यंत पोहोचतं, याची एक गंमत सांगते. काही दिवसांपूर्वी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांचा प्रयोग पुण्यातल्या साठे नाट्यगृहात होता. तेव्हा नाटकात मी एन्ट्री घेते म्हणाले की, ‘नमस्कार तुम्ही मला ओळखलं का?’ तर प्रेक्षक ओरडले भुवनेश्वरी, भुवनेश्वरी म्हणून. त्यावेळेस मी थांबले आणि म्हटलं, भुवनेश्वरी सोमवार ते शनिवारी रात्री आठ वाजता फक्त ‘झी मराठीवर’. इथे मी मनी मनिषा, असं म्हणून पुढे नाटक सुरू केलं. हे खूप छान वाटत. ही मोठी प्रशंसा असल्यासारखं वाटत.”

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मधील सायलीचा नणंदेबरोबर ‘बादल बरसा बिजुरी’वर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “पूर्णा आजी…”

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार मुख्य भूमिकेत आहेत. तर कविता मेढेकर आणि विजय गोखले यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada fame kavita medhekar narrated an incident that happened during the play eka lagnachi pudhchi gosht pps