छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेल्यावर्षी १३ मार्चपासून अक्षरा-अधिपतीच्या अनोख्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला. आता लवकरच या मालिकेला १ वर्ष पूर्ण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. त्यांच्या मालिकेला यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात देखील भरभरून यश मिळालं. त्यामुळेच आता अभिनेत्रीची निर्मितीसंस्था एक पाऊल पुढे टाकत प्रेक्षकांसाठी आणखी एक मालिका प्रदर्शित करणार आहे.

हेही वाचा : “सरकाराने कोणतीही बनवाबनवी…”, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट, म्हणाले…

शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच ‘झी मराठी’वर येणार असून या मालिकेतून हिंदी कलाविश्वात नावाजलेला अभिनेता राकेश बापट छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार असल्याचं नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे.

हेही वाचा : Video : तेजस्विनी पंडितचं नव्या क्षेत्रात पदार्पण! पुण्यात सुरू केला ‘हा’ व्यवसाय, राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

“आमची दुसरी मालिका निर्माते म्हणून घेऊन येतोय तुमच्या भेटीला “नवरी मिळे हिटलरला” झी मराठीवर…आमच्या पहिल्या मालिकेला “तुला शिकवीन चांगलाच धडा”ला भरभरून पसंती तुम्ही देताय…तसाच रसिकमायबाप तुमचा आशीर्वाद या मालिकेवर पण राहू दे” अशी पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाने ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. दरम्यान, कविता मेढेकर, अभिजीत खांडकेकर, सुकन्या मोने, जान्हवी किल्लेकर, प्रतिक्षा लोणकर या मराठी कलाकारांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.