फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमी युगलांना वेध लागतात व्हॅलेंटाईन डेचे. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपणार आहे. आतापर्यंत रोझ डे, प्रपोज डे झाला आहे. आज चॉकलेट डे आहे. व्हॅलेंटाईन डेला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रेमी युगल आपल्या प्रियजनांसाठी खास प्लॅन करत आहेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील मास्तरीण बाईने आपल्या खऱ्या आयुष्यातील अधिपतीबरोबर व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार आहे? याचा खुलासा केला आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णी यांना मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. बरेच वर्षे डेट केल्यानंतर ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शिवानी-विराजसने लग्नगाठ बांधली. यंदा दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होतील. अशातच लग्नानंतरच्या दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन काय असणार आहे? याबाबत शिवानीने सांगितलं आहे.
हेही वाचा – तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचं लग्न ठरताच भगरे गुरुजींच्या लेकीला झाला आनंद, म्हणाली, “चला पुढच्या…”
शिवानी म्हणाली की, “माझ्या जीवनातली ती खास व्यक्ती सर्वांनाच माहिती आहे तो विराजस आहे. आमच्यामध्ये पती-पत्नीच्या नात्याआधी आमची मैत्री आहे. ज्यामुळे नात्यांमध्ये एक वेगळाच ताजेपणा आहे. आमचा नेहमी आसपास शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचा प्रयत्न असतो. आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकाला आवडणाऱ्या गोष्टी करतो.”
हेही वाचा – अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली, “आपण किती…”
“आमचा व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन असा आहे की, दोघांना ही घरचं खाण्याची आवड आहे. त्यामुळे काही तरी घरीच बनवून खायला आम्हाला दोघांना आवडेल आणि एखादी छान फिल्म किंवा सीरिज बघू. विराजसला मला या माध्यमातून सांगायचंय आहे की, तू नवरा होण्याआधी माझा मित्र आहेस आणि याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. १०-१२ वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो, आपण एकमेकांची प्रगती होतांना पहिली आहे, प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहेस. तर जसा आहे तसाच राहा कधी ही बदलू नकोस,” अशी शिवानी म्हणाली.