नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखलं जातं. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारत आहे. अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. शिवानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शूटिंग असो किंवा वैयक्तिक आयुष्य ती प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षकांच्या या लाडक्या मास्तरीण बाईंनी २०२२ मध्ये अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. शिवानी आणि तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यामधील सुंदर बॉण्डिंगची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. परंतु, अभिनेत्रीच्या आईला फार कमी जणांनी पाहिलं असेल. लाडक्या आईच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने खास पोस्ट व काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा : 12th Fail : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने घेतली IPS मनोज शर्मांची भेट, फोटो आला समोर…

“Happy Birthday आई! आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय तुझं आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्या चांगल्या गोष्टी फक्त तुझ्यामुळे शक्य झाल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय तुला आहे.” अशी पोस्ट शेअर करत शिवानीने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”

दरम्यान, शिवानीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी शिवानी एकदम तिच्या आईसारखी दिसते अशा कमेंट्स या पोस्टवर केल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकेत ती अक्षराच्या भूमिकेत झळकत आहे. गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada fame shivani rangole shares birthday wish post for her mother sva 00