मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’ या मालिकांमधून ती घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या शिवानी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. शिवानी रांगोळेने या मालिकेत ‘अक्षरा’ हे पात्र साकारलं आहे. याशिवाय तिला या मालिकेमुळे मास्तरीणबाई हे नवीन टोपणनाव मिळालं आहे. अक्षरा अधिपतीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आपण नेहमीच पाहतो. पण, शिवानीचं वैयक्तिक आयुष्यातील कुटुंब तुम्ही पाहिलंत का? तिने कुटुंबीयांबरोबरचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा : पाकिस्तानमध्ये मराठमोळ्या तरुणाचा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स; संजू राठोड कमेंट करत म्हणाला…
अभिनेत्री शिवानी रांगोळेने वैयक्तिक आयुष्यात ३ मे २०२२ रोजी अभिनेता विराजस कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. शिवानी-विराजसची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी थाटामाटात लग्न केलं. सध्या शिवानीच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
हेही वाचा : गौरव मोरे, कुशल बद्रिकेचा ‘मॅडनेस मचाएंगे’ अवघ्या दोन महिन्यांत होणार बंद? वाहिनीने घेतला मोठा निर्णय
शिवानी रांगोळेने शेअर केला लग्नातील खास फोटो
शिवानीने शेअर केलेल्या फोटोमध्ये मास्तरीणबाईंचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. सासूबाई मृणाल कुलकर्णी, सासरे, पती विराजस, शिवानीचे आई-बाबा असा एकत्र फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “२ वर्षांपूर्वी हा सुंदर फोटो काढलेला…दिवस कसे पटकन निघून गेले” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
हेही वाचा : निवडणुकीच्या धुरळ्यात रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत, “मराठी Not Welcome म्हणणाऱ्यांना, घरं नाकारणाऱ्यांना..”
दरम्यान, शिवानी रांगोळेच्या चाहत्यांनी या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता शिवानी-विराजसची ही खऱ्या आयुष्यातील जोडी ऑनस्क्रीन एकत्र केव्हा दिसणार याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. याशिवाय ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत शिवानीसह ऋषिकेश शेलार, कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.