‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी अशी मालिकेतील सगळीच पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. अशातच आता अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात एक नवं वळणं आलं आहे. ४ सप्टेंबरला अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा विशेष सप्ताह पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – “तरुण राहण्यासाठी गोळ्या खातोय”, क्रांती रेडकरनं अभिजीत पानसेंबरोबर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
यानिमित्तानं ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी अक्षरा आणि अधिपतीनं संवाद साधला. यावेळी अक्षरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळेनं खऱ्या लग्नाचा किस्सा सांगितला. दोघांना विचारलं गेलं होतं की, ‘खऱ्या आयुष्यात दोघांचंही लग्न झालंय. आता या लग्नाच्या निमित्तानं अशी कोणती गोष्ट आहे, जी तुमच्या लग्नात करायची राहिली होती, ती हौस आता इथे पूर्ण करून घेताय.’
हेही वाचा – “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात” किरण मानेंनी शेअर केलेलं मीम चर्चेत; म्हणाले, “एका फटक्यात….”
हेही वाचा – कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ एका फेसबुक लाईव्हमुळे झाला होता मोठा राजकीय गोंधळ; किस्सा सांगत म्हणाला…
यावर शिवानी म्हणाली की, “मला माझ्या लग्नात पांढरी आणि लाल रंगाची साडी नेसायची होती. माझं लग्न दाक्षिणात्य पोशाखात झालं होतं. मला ‘टू स्टेट्स’ (2 States) हे पुस्तक खूप आवडतं. चित्रपट नाही, तर पुस्तक आवडतं. त्यामुळे त्या पुस्तकात दिलेल्या पद्धतीनं माझ लग्न व्हावं असं वाटत होतं. म्हणून माझ्या खऱ्या लग्नात आमचा सगळ्यांचा पोशाख दाक्षिणात्य पद्धतीत होता. पण यावेळी मला पांढरी आणि लाल रंगाची साडी नेसायची होती. मात्र हे काही घडलं नाही. आणि आता साखरपुड्याच्या सीनमध्ये मी पांढरी आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. आमची निर्माती शर्मिष्ठा ताईनं स्वतः ही साडी निवडली. तेव्हा मी माझ्या आईला लगेच म्हटलं, बघ तिथे तू नाही म्हणाली होतीस, आता मी इथे माझी हौस पूर्ण करून घेतेय.”
हेही वाचा – “मी पवित्र…”; राखी सावंतचा नवा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, “पुरुषांनी मला स्पर्श…”
पुढे शिवानी म्हणाली की, “खऱ्या आयुष्यात आमचा साखरपुडा सुद्धा झाला नव्हता. आम्ही थेट प्रपोज आणि लग्नच केलं. त्यामुळे आता या मालिकेच्या निमित्तानं साखरपुड्याची हौस सुद्धा पूर्ण झाली.”