बॉलीवूडचे सुपरस्टार म्हणून धर्मेंद्र यांना ओळखलं जातं. ‘शोले’, ‘यमला पगला दीवाना’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ अशा असंख्य चित्रपटांमधून धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही धरमजींना भेटण्यासाठी त्यांचा प्रत्येक चाहता आतुर असतो. असाच काहीसा अनुभव ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर यांना आला.

स्वप्नील राजशेखर यांनी नुकतीच सुपस्टार धर्मेंद्र यांची राहत्या घरी भेट घेतली. ते धर्मेंद्र यांना पाहून एवढे भारावून गेले की, त्यांचा संपूर्ण आनंद व पहिल्या भेटीची आठवण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्वप्नील यांनी या भेटीचे काही खास क्षण व फोटो या पोस्टद्वारे शेअर केले आहेत.

Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
Ashok Saraf
“नशीब काढलंय मी…”, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकलाकाराची खास पोस्ट; म्हणाली…
Deepika Padukone Ramp Walk
Video : लेकीच्या जन्मानंतर पहिला रॅम्प वॉक! दीपिका पादुकोणचा ‘तो’ लूक पाहून नेटकऱ्यांना आठवली रेखा, कमेंट्सचा पाऊस
Tula Shikvin Changalach Dhada new actor entry
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये आला नवीन पाहुणा! ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, ‘तो’ क्षण पाहून अधिपतीचे डोळे पाणावले…

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : भूतकाळातील आठवणींमुळे सायलीला होतोय त्रास! अपघाताचं रहस्य अर्जुनला समजेल का? मालिकेत येणार नवं वळण…

स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट

हे होणार होतंच…ये तो होना ही था….
It was written in my destiny…

धरम्याला भेटून मला हेच आणि असंच वाटणार होतं..
जन्नत कळणार होतीच मला.. स्वर्ग!! शब्दशः स्वर्ग

आयच्यान सांगतो, तो असाचं प्रेमाने भेटेल, असाच मायेने पाठीवर हात फिरवेल असं त्याला न भेटताही वाटत होतं.

तो आहेच तसा…
प्रेमळ, मायाळू, मनमोकळा, जिंदादील, दर्यादिल, जिंदगी से भरपूर…हे त्याला सिनेमात, टिव्हीत, सोशल मीडीयावर बघून, त्याच्या बद्दल ऐकून कळत होतं…तसंच झालं… अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळालं..भरुन पावलो मी…

तो धरम आहे…भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सर्वात देखणा, सर्वात हँडसम आणि भन्नाट अभिनेत्यांपैकी एक… आणि तो बेफाट माणुस आहे.

एक गोष्ट त्याला इतर सुपरस्टार्स पेक्षा वेगळं बनवते..
त्याला आजही प्रत्येक माणसाशी आत्यंतिक प्रेमाने सेहनेवालीया धरमेंद्र देओल म्हणून कनेक्ट करता येतं.. त्याला प्रेम उत्तम रितीने रिसीव्ह करता येतं…ते दुप्पट करुन देता येतं. हे वाटतं तितकं सोपं नाही..

अनेक स्टार्स, सुपरस्टार्स चाहत्यांच्या अपरंपार प्रेमाने भांबावतात, ओशाळतात, संकोचतात, कधी कधी तर तुसडे, श्रृढ होतात..धरम मात्र अशा प्रेमाने भारावतो, हळवा होतो.. हात पसरुन तो प्रेमाने भेटणाऱ्याला कवेत घेतो… हे दैवी आहे.. समोरच्याचं आयुष्य उजळुन निघतं यामुळे….

गेल्या चार वर्षांपासून मनात होतं की धरम्याला भेटायला हवं.. काहीही करुन धरम भेटायलाच हवा..मी माफक प्रयत्न केले.. योग आला नाही…पण इच्छा प्रबळ होती…

अचानक एकदा रात्री अजयचा फोन आला, “उद्या धरमला भेटायची शक्यताय.. काय करतोयस ?”
अजयनं सगळी जादू घडवुन आणली….ते “किसी चीज को शिद्दत से चाहो तो…” ते सगळं झालं….

आणि थेट धरमच्या त्या सुप्रसिध्द बंगल्यावर माझ्या आयुष्यातला हा सोनेरी योग आला…इतकं लिहूनही कळतंय शब्द तोकडे आहेत…

नशीब काढलं मी…माझ्यासारखे लाखोजण त्याच्याकडे अपार प्रेमाने, श्रध्देने, भारावूनच बघतील….त्याने माझ्याकडे इतक्या मायेने पहावं..
पाठीवरुन, डोक्यावरुन हात फिरवावा… खरंच नशीब.. दुसरं काय ?!!

आणखी एक.. त्याचा हात आजही ढाई किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे… पंजा माझ्या दिडपट आहे… पण अत्यंत उबदार, मायाळु तळवे आहेत त्याचे…मैने हात चुम लिये उसके…स्पर्श जाम ओळखीचा होता तो…

अजय, तहहयात तुझ्या कर्जात मी…
त्या सुचेता मॅमचं देव भलं करो…

तर दोस्तहो….जगात देव आहे…जन्नत इथेच आहे..
जगात आपला ‘यमला पगला दिवाना’ धरम आहे….

लहानपणापासूनच्या अनेक धरमवेड्या मित्रांची प्रकर्षाने आठवण आली… आणि नरेंद्र देसाई, रोहित हळदीकर, गुरुदत्त सोनसूरकर तुम्हाला तर लई मिस केलंय भावांनो…

हेही वाचा : “मानवी इतिहासात…”, मासिक पाळीतील पगारी रजेबद्दल स्मृती इराणींच्या विधानावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

दरम्यान, आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे धर्मेंद्र यांच्याबरोबर झालेली भेट स्वप्नील राजशेखर यांच्यासाठी खूप खास होती. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय राजशेखर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यामध्ये त्यांनी ‘चारुहास’ हे अधिपतीच्या बाबांचं पात्र साकारलं आहे.

Story img Loader