बॉलीवूडचे सुपरस्टार म्हणून धर्मेंद्र यांना ओळखलं जातं. ‘शोले’, ‘यमला पगला दीवाना’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ अशा असंख्य चित्रपटांमधून धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही धरमजींना भेटण्यासाठी त्यांचा प्रत्येक चाहता आतुर असतो. असाच काहीसा अनुभव ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर यांना आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्वप्नील राजशेखर यांनी नुकतीच सुपस्टार धर्मेंद्र यांची राहत्या घरी भेट घेतली. ते धर्मेंद्र यांना पाहून एवढे भारावून गेले की, त्यांचा संपूर्ण आनंद व पहिल्या भेटीची आठवण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्वप्नील यांनी या भेटीचे काही खास क्षण व फोटो या पोस्टद्वारे शेअर केले आहेत.
स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट
हे होणार होतंच…ये तो होना ही था….
It was written in my destiny…धरम्याला भेटून मला हेच आणि असंच वाटणार होतं..
जन्नत कळणार होतीच मला.. स्वर्ग!! शब्दशः स्वर्गआयच्यान सांगतो, तो असाचं प्रेमाने भेटेल, असाच मायेने पाठीवर हात फिरवेल असं त्याला न भेटताही वाटत होतं.
तो आहेच तसा…
प्रेमळ, मायाळू, मनमोकळा, जिंदादील, दर्यादिल, जिंदगी से भरपूर…हे त्याला सिनेमात, टिव्हीत, सोशल मीडीयावर बघून, त्याच्या बद्दल ऐकून कळत होतं…तसंच झालं… अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळालं..भरुन पावलो मी…तो धरम आहे…भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सर्वात देखणा, सर्वात हँडसम आणि भन्नाट अभिनेत्यांपैकी एक… आणि तो बेफाट माणुस आहे.
एक गोष्ट त्याला इतर सुपरस्टार्स पेक्षा वेगळं बनवते..
त्याला आजही प्रत्येक माणसाशी आत्यंतिक प्रेमाने सेहनेवालीया धरमेंद्र देओल म्हणून कनेक्ट करता येतं.. त्याला प्रेम उत्तम रितीने रिसीव्ह करता येतं…ते दुप्पट करुन देता येतं. हे वाटतं तितकं सोपं नाही..अनेक स्टार्स, सुपरस्टार्स चाहत्यांच्या अपरंपार प्रेमाने भांबावतात, ओशाळतात, संकोचतात, कधी कधी तर तुसडे, श्रृढ होतात..धरम मात्र अशा प्रेमाने भारावतो, हळवा होतो.. हात पसरुन तो प्रेमाने भेटणाऱ्याला कवेत घेतो… हे दैवी आहे.. समोरच्याचं आयुष्य उजळुन निघतं यामुळे….
गेल्या चार वर्षांपासून मनात होतं की धरम्याला भेटायला हवं.. काहीही करुन धरम भेटायलाच हवा..मी माफक प्रयत्न केले.. योग आला नाही…पण इच्छा प्रबळ होती…
अचानक एकदा रात्री अजयचा फोन आला, “उद्या धरमला भेटायची शक्यताय.. काय करतोयस ?”
अजयनं सगळी जादू घडवुन आणली….ते “किसी चीज को शिद्दत से चाहो तो…” ते सगळं झालं….आणि थेट धरमच्या त्या सुप्रसिध्द बंगल्यावर माझ्या आयुष्यातला हा सोनेरी योग आला…इतकं लिहूनही कळतंय शब्द तोकडे आहेत…
नशीब काढलं मी…माझ्यासारखे लाखोजण त्याच्याकडे अपार प्रेमाने, श्रध्देने, भारावूनच बघतील….त्याने माझ्याकडे इतक्या मायेने पहावं..
पाठीवरुन, डोक्यावरुन हात फिरवावा… खरंच नशीब.. दुसरं काय ?!!आणखी एक.. त्याचा हात आजही ढाई किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे… पंजा माझ्या दिडपट आहे… पण अत्यंत उबदार, मायाळु तळवे आहेत त्याचे…मैने हात चुम लिये उसके…स्पर्श जाम ओळखीचा होता तो…
अजय, तहहयात तुझ्या कर्जात मी…
त्या सुचेता मॅमचं देव भलं करो…तर दोस्तहो….जगात देव आहे…जन्नत इथेच आहे..
जगात आपला ‘यमला पगला दिवाना’ धरम आहे….लहानपणापासूनच्या अनेक धरमवेड्या मित्रांची प्रकर्षाने आठवण आली… आणि नरेंद्र देसाई, रोहित हळदीकर, गुरुदत्त सोनसूरकर तुम्हाला तर लई मिस केलंय भावांनो…
हेही वाचा : “मानवी इतिहासात…”, मासिक पाळीतील पगारी रजेबद्दल स्मृती इराणींच्या विधानावर कंगना रणौतची प्रतिक्रिया
दरम्यान, आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे धर्मेंद्र यांच्याबरोबर झालेली भेट स्वप्नील राजशेखर यांच्यासाठी खूप खास होती. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय राजशेखर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यामध्ये त्यांनी ‘चारुहास’ हे अधिपतीच्या बाबांचं पात्र साकारलं आहे.