मराठमोळा अभिनेता हृषिकेश शेलार नेहमीच चर्चेत असतो. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून हृषिकेश घराघरांत पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर हृषिकेशने मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या हृषिकेश ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत झळकत आहे. या मालिकेत त्याने साकारलेले अधिपती हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर हृषिकेश मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. हृषिकेशच्या नव्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हृषिकेश व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची नुकतीच एका कार्यक्रमात भेट झाली. हृषिकेशने या भेटीदरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच या फोटोबरोबर एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.

हेही वाचा- “तू आई होऊ शकणार नाहीस”, जुई गडकरीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली, “वयाच्या २७ व्या वर्षी…”

हृषिकेशने पोस्टमध्ये लिहिले, “दहा वर्षांपूर्वी आपल्या जवळच्या एका शहरात आपल्या सगळ्यात लाडक्या नटाचं नाटक आलेलं असतं. आपण आपल्या जिगरी दोस्ताबरोबर आपल्या ‘त्या’ आवडत्या नटाचे डायलॉग्ज म्हणत म्हणतच दीड-दोन तासांची रपेट करून नाटकाला पोहोचतो. पडदा उघडतो आणि ‘ते’ स्टेजवर येतात, आपण त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतो.. आणि पाहतच राहतो. हाच तो नट ज्यानं आपलं बालपण सुंदर केलं, आनंदी केलं. हाच तो नट जो आपल्याला एवढा आपलासा वाटतो, जवळचा वाटतो, की तो आपल्या स्वप्नात येतो. आपण बुचकळ्यात.. हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतंय?”

“नाटक संपल्यावर बॅक स्टेजला मोठी रांग.. त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी. आपणही त्या गर्दीत सामील होतो. अर्धा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुप्परस्टारच्या जवळ पोहोचल्यावर अचानक काहीतरी वाटतं आणि आपण फोटो न काढताच बाजूला होतो रांगेतून आणि दोस्ताला कानात म्हणतो, “मला ‘गर्दी’ म्हणून नाही भेटायचं यांना. मी भेटणार नक्की; पण आता असं नाही”. बॅक स्टेजला घुटमळत आमच्या भेटीचा तो क्षण आपण लांबणीवर टाकून देतो, अनिश्चित काळासाठी. आपण परत बुचकळ्यात. हा शहाणपणा की मूर्खपणा?”

हेही वाचा- लोकप्रिय युट्यूबर अभि आहे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेक, तर नियू आहे सून; दोघांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सन्मान

“बरोबर १० वर्षांनी, आता स्टेजवर आपल्या ‘त्या’ सुप्परस्टारच्या हस्ते आपला सत्कार होतो, ते आपल्या कामाचं कौतुक करीत असतात आणि त्यांचे शब्द ‘स्लोमो’मध्ये आपल्या कानावर हळुवार मोरपिसासारखे…! अगदी तसंच, जसं आपण अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिलंय. आपला आपल्या कानांवर-डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आपण थेट त्यांचे पाय धरतो, स्लोमोमध्येच. बॅकस्टेजच्या रांगेतला मी, स्टेजवरच्या माझ्याकडे पाहून हसतो आणि आपण परत एकदा कंटिन्युटीमध्ये बुचकळ्यात… हे सत्य आहे की तेच स्वप्न कंटिन्यू होतंय?” हृषिकेशची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.