Tula Shikvin Changlach Dhada : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या दीड वर्षांपासून शर्मिष्ठा राऊतची निर्मिती असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार यांची फ्रेश ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा असतो. तर, अक्षरा ही एका शाळेत शिक्षिका असते. त्यामुळे अधिपती तिला प्रेमाने ‘मास्तरीण बाई’ अशी हाक मारत असतो. त्याचं अक्षरावर मनापासून प्रेम असतं. सुरुवातीला या दोघांचं मनाविरुद्ध लग्न होतं. पण, आता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भागात अक्षराने अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
हेही वाचा : “लग्न केवळ दोन व्यक्तींचं नसून…”, रितेश देशमुखची अनंत अंबानी व राधिका मर्चंटसाठी खास पोस्ट; म्हणाला, “तुमचे पालक…”
शर्मिष्ठा राऊतने शेअर केला खास व्हिडीओ
अक्षरा व अधिपतीच्या सुखी संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरी कायम नवनवीन डाव रचत असते. या दोघांनाही घराबाहेर काढून भुवनेश्वरीने त्यांची परीक्षा देखील घेतली. परंतु, आता लवकरच मालिकेत एक नवीन वळण येणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ची निर्माती शर्मिष्ठा राऊतच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे मालिकेतल्या या नव्या ट्विस्टबाबत लहानशी हिंट या मालिकेच्या चाहत्यांना मिळाली आहे.
अक्षरा व अधिपती आता लवकरच हनिमूनला जाणार असल्याचा सीक्वेन्स मालिकेत सुरू होणार आहे. तत्पूर्वी मालिकेची टीम शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे. याची खास झलक शर्मिष्ठाने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. तर, शिवानी रांगोळेने देखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा : खूपच बदललीय ‘लगान’मधील निरागस गौरी, २३ वर्षांनंतर आता कशी दिसते अभिनेत्री Gracy Singh? पाहा व्हिडीओ
अक्षरा- अधिपती फिरायला गेल्याने दुसरीकडे भुवनेश्वरीचा संताप होत असल्याचं मालिकेत पाहायला मिळेल. शर्मिष्ठाने पोस्ट शेअर करत मालिकेची लेखिका मधुगंधा कुलकर्णीचे ही सुंदर मालिका लिहिल्याबद्दल आभार मानले आहेत. शर्मिष्ठाच्या या व्हिडीओवर सर्व कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.