‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada) मालिकेत नाट्यमय घटना पाहायला मिळत आहेत. भुवनेश्वरीने चारुहासबरोबर लग्न करण्यासाठी चारुलताचे घेतलेले रूप, तिचे सत्य बाहेर आणण्यासाठी अक्षराने केलेले प्रयत्न, या सगळ्यात अक्षरा-अधिपतीमध्ये झालेले गैरसमज यांमुळे मालिकेत सतत ट्विस्ट पाहायला मिळतात. आता अक्षरा-अधिपती यांच्यात गैरसमज वाढणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

…तर मी वाटेल ते हरेन

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, भुवनेश्वरी व अधिपती यांच्यात संवाद सुरू आहे. अधिपती भुवनेश्वरीला म्हणतो, “…तर मी वाटेल ते हरेन. तुम्ही म्हणाल ते करेन.” अधिपतीच्या या बोलण्यानंतर भुवनेश्वरी त्याच्याकडून वचन मागते. अधिपती तिला वचन देतो. याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अक्षराचे वडील पोलीस ठाण्यात गेले आहेत. ते तेथील पोलिसांना सांगतात की, माझी मुलगी सुरक्षित नाही. तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या आणि काहीतरी अॅक्शन घ्या. त्यानंतर अधिपतीच्या फोनवर पोलीस फोन करतात. अधिपती त्यांना विचारतो की, तक्रार कोणी केलीय? त्यावर पोलीस अक्षराचे नाव घेतात. ते ऐकल्यानंतर अधिपतीच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव दिसत आहेत.

हा प्रोमो शेअर करताना, “पोलिसांकडे केलेली तक्रार अधिपतीच्या मनात गैरसमज अधिक वाढवणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये भुवनेश्वरीमुळे अधिपती व अक्षरा यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत. अक्षराने अधिपतीचे घर सोडले असून, सध्या ती तिच्या आई-वडिलांकडे राहते. भुवनेश्वरीविषयी अक्षराच्या मनात राग असला तरी अधिपतीविषयी तिच्या मनात प्रेम आहे. अधिपतीनेदेखील तिला घरातून बाहेर पडताना थांबवले नसले तरी त्यालाही अक्षराला भेटण्याची ओढ असल्याचे दिसते. ते एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असून, ते नाना परीने प्रयत्नही करतात. संक्रांतीच्या दिवशी अक्षरा तिच्या वडिलांसह सासरी अधिपतीला भेटण्यासाठी गेली होती. त्याच वेळी अक्षराला भेटण्यासाठी अधिपती अक्षराच्या घरी गेला होता. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. याउलट भुवनेश्वरीने अक्षरा व तिच्या वडिलांचा अपमान केला. दुसरीकडे अक्षराच्या बहिणीने अधिपतीच्या मनात अक्षराविषयी गैरसमज निर्माण केला.

आता अक्षरा व अधिपतीमधील गैरसमज आणखी वाढणार का, त्यांच्यातील दुरावा कधी दूर होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader