‘झी मराठी’ वाहिनीवर साधारण दीड वर्षांपूर्वी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही दिवसांपूर्वीच मालिकेने नाबाद ४०० भाग पूर्ण केले. दमदार स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करून घेतलं. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षरा ही उच्चशिक्षित व एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असते. यामुळे अधिपती तिला मास्तरीणबाई अशी हाक मारत असतो. अक्षराचं लग्न मनाविरुद्ध अधिपतीशी होतं. परंतु, हळुहळू अधिपती स्वत:च्या चांगुलपणाने अक्षराचं मन जिंकून घेतो. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका भागात अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला दिली. अक्षराने अधिपतीसारख्या रांगड्या स्टाइलने तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सांगितलं. बायकोने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर अधिपतीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अक्षरा-अधिपतीचं सूत जुळल्याची बातमी आता भुवनेश्वरीपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

हेही वाचा : “दामले निवृत्त व्हा”, प्रशांत दामलेंच्या पोस्टवर नेटकऱ्याचा खोचक सल्ला, अभिनेत्याने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला दिली असून यानंतर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झाला आहे. त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की, त्यांच्यासाठी काहीतरी खास करायचं. अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरु करते. ही गोष्ट जेव्हा भुवनेश्वरीला कळते तेव्हा तिचा संताप होतो.

हेही वाचा : Video : अवघ्या दीड वर्षांच्या राहा पूरचं प्राणीप्रेम! रणबीरच्या लेकीची ‘ती’ कृती कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : ३५ व्या वर्षी सगळे दात पडले, ५४ व्या वर्षी अभिनय करिअरला सुरुवात; आयुष्यभर अविवाहित राहिल्या ‘पंचायत ३’च्या अम्माजी!

भुवनेश्वरी अधरा-अधिपतीला वेगळं करण्याचा नवा कट रचण्याच्या तयारीत आहे. भुवनेश्वरी मुद्दाम दुर्गेश्वरीला त्यांची खोली जातीने लक्ष घालून सजवण्याचा आदेश देते. आता यात भुवनेश्वरीचा नवीन प्लॅन नक्की काय आहे? अक्षरा अधिपतीमध्ये यामुळे एका नव्या नात्याची सुरुवात होणार? की पुन्हा एकदा भुवनेश्वरीला या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यात यश येणार याचा उलगडा लवकरच होणार आहे. मालिकेचा हा विशेष भाग येत्या १४ जून रोजी प्रसारित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada serial new promo bhuvneshwari creates new plan for akshara and adhipati sva 00