‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’ या मालिकांमधून अभिनेत्री शिवानी रांगोळे घराघरांत लोकप्रिय झाली. आजवर तिने विविध नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या शिवानी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची भरभरून प्रसंती मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी रांगोळेने या मालिकेत ‘अक्षरा’ हे पात्र साकारलं आहे. तिच्या जोडीला अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपतीची भूमिका निभावली आहे. मालिकेत अधिपती अक्षराला प्रेमाने मास्तरीण बाई अशी हाक मारत असतो. त्यामुळे शिवानीला आता घराघरांत अक्षराप्रमाणे मास्तरीणबाई हे नवीन टोपणनाव मिळालं आहे.

हेही वाचा : “मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला अन्…”, अभिनय बेर्डेसाठी क्षितीज पटवर्धनची पोस्ट; म्हणाला, “बरीच मुलं वारसा घेतात, याने…”

मालिकेत अक्षराच्या पात्राला शोभेल असा लूक अभिनेत्री करते. नेहमीच ती साडी, भरजरी दागिने, हातात चुडा अशा लूकमध्ये पाहायला मिळते. परंतु, शिवानीने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्विमिंगपूल मधला फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मालिकेत नेहमीच सोज्वळ राहणाऱ्या मास्तरीणबाईंचा हा हटके लूक चर्चेत आला आहे. ‘स्विमिंग पूलमधून सूर्यास्त पाहण्याचा आनंदा वेगळाच असतो’ असं कॅप्शन शिवानीने या फोटोला दिलं आहे.

हेही वाचा : कंगना रणौतने प्रचारसभेत अमिताभ बच्चन यांच्याशी केली स्वतःची तुलना; नेटकऱ्यांना हसू आवरेना, म्हणाले, “हिचा शेवटचा…”

हेही वाचा : “लग्नाआधी ३ वर्षे एकत्र राहिलो”, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल म्हणाले, “आई बाबांनी…”

शिवानी रांगोळे कमेंट्स

“सोज्वळ मास्तरीण बाई”, “आईसाहेब मारतील की”, “अप्रतिम”, “काय मस्त दिसताय…सोज्वळ मास्तरीण बाई”, “जलपरी”, “एकच नंबर ओ” अशा असंख्य प्रतिक्रिया शिवानीच्या फोटवर युजर्सनी केल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने २०२२ मध्ये अभिनेत विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. शिवानी आणि विराजस या जोडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोघांनी एकत्र अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात सासूबाई मृणाल कुलकर्णी, विराजस आणि शिवानीने एकत्र भूमिका साकारल्या होत्या. सध्या अभिनेत्री ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada shivani rangole shares photo in swimming pool netizens reacted sva 00