अभिनेत्री शिवानी रांगोळे आतापर्यंत विविध मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तीन दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस झाला. तर आता या मालिकेच्या सेटवर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील सर्व टीमने मिळून शिवानीचा वाढदिवस त्यांच्या सेटवर साजरा केला आहे. त्याचे खास झलक शेअर करून शिवानीने तो सेटवर कसा साजरा झाला हे चाहत्यांना दाखवलं आहे.

आणखी वाचा : अधिपती व त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीने अक्षराला दिलं वाढदिवसाचं खास सरप्राईज, फोटो शेअर करत शिवानी म्हणाली…

शिवानी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल अपडेट्स देत असते. तर नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत तिने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या सेटवर सर्वांनी तिचा वाढदिवस साजरा केल्याचं सांगितलं. या मालिकेच्या टीमने शिवानीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक छोटा आणि एक मोठा असे दोन केक आणले होते. छोट्या केकवर लिहिलं होतं ‘शिवानी’ आणि मोठ्या केकवर लिहिलं होतं ‘मास्तरीणबाई.’ हे दोन्ही केक कापत त्या सर्वांनी शिवानीचा वाढदिवस सेटवर साजरा केला.

हेही वाचा : मास्तरीण बाईंचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव कसा? अधिपतीने सांगूनच टाकलं, शिवानीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत ऋषिकेश म्हणाला…

शिवानीने हा फोटो शेअर करत सर्व टीमचे आभार मानले. आता तिने शेअर केलेली ही स्टोरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada team celebrates shivani rangoli birthday on their shooting set rnv