टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या घेत जीवन संपवलं. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शीझान खानला अटक करण्यात आली आहे. त्याच्या पोलीस कोठडीत ३० डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुनिषा व शीझान गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शीझानने ब्रेकअप केल्यामुळे नैराश्यात जाऊन तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तुनिषा शर्माला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. तुनिषा आत्महत्या प्रकरणावर मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही यावर एक ट्वीट केलं आहे.

“मनोरंजन विश्वात खूनाला आत्महत्या म्हणण्याचा ट्रेंड नवीन नाही. नुकतंच सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या टीममधील रुपकुमार शाह यांनी त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. त्याच्या शरीरावरील खुणा या आत्महत्येच्या नाहीत, असंही ते म्हणाले आहेत”, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>>‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट निर्मात्यांची घोषणा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा संबंध शर्लिनने तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाशी जोडला आहे. पुढे तिने ट्वीटमध्ये “तुनिषासारखी मुलगी आत्महत्या करू शकत नाही, असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. या प्रकरणात पोलिसांनी खून झाल्याच्या अंगलनेही तपास करण्याची गरज आहे”, असंही म्हटलं आहे.

हेही वाचा>>“लघुशंकेवर नियंत्रण नाही, डायपरसाठी पैसे नसल्यामुळे कागद…”, प्रसिद्ध अभिनेता करतोय गंभीर आजाराशी सामना

हेही वाचा>>“लोकांना आवडतं म्हणून ते…”, लावणी कार्यक्रमातील चाहत्यांच्या गर्दीवरुन गौतमी पाटील स्पष्टच बोलली

तुनिषा शर्माने अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवरच गळफास घेत जीवन संपवलं. तिच्या मृतदेहावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या अंत्यसंस्कारासाठी शीझान खानची आई व बहीणही उपस्थित होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma case actress sherlyn chopra reacts says its trend in film industry to call murder a suicide kak
Show comments