टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड व सहकलाकार शीझान खान चार दिवसीय पोलीस कोठडीत आहे. शीझानची पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, शीझानने तुनिषा संदर्भात अनेक खुलासे पोलीस चौकशीत केले आहेत.

शीझान खानने ब्रेकअप केल्यामुळे तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यापूर्वीही तुनिषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक खुलासा शीझानने पोलीस चौकशीत केला आहे. “मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीही तुनिषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मीच तिला या संकटातून वाचवलं होतं”, असं शीझानने सांगितलं आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”

हेही वाचा>> “तिच्यामुळे शीझान खानचं करिअरही…”, तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्याचं ट्वीट

हेही वाचा>> लग्नानंतर कुंकू न लावल्यामुळे देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणतात “तू पुढची तुनिषा शर्मा…”

तुनिषाच्या आईलाही तिच्या आत्महत्येबाबत कल्पना होती, असंही त्याने पोलीस चौकशीत उघड केलं आहे. “तुनिषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्या आईला मी फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. तुनिषाशी बोलून तिची काळजी घेण्यास सांगण्याचेही तिच्या आईला मी सांगितले होते”, असं तो म्हणाला. तुनिषाशी प्रेमसंबंध असल्याचंही शीझानने पोलीस चौकशीत मान्य केले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा>>लग्नानंतर एक वर्षाने कतरिना कैफ-विकी कौशल देणार गुडन्यूज? ख्रिसमस सेलिब्रेशनच्या ‘त्या’ फोटोंमुळे चर्चेला उधाण

तुनिषाने २४ डिसेंबरला अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यानच गळफास घेत आत्महत्या केली होती. या मालिकेत ती मुख्य नायिकेची भूमिका साकारत होती. तुनिषाने अनेक मालिकांसह चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्यावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार होणार आहेत.

Story img Loader