अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. तुनिषा शर्माच्या आईने तिचा कथित बॉयफ्रेंड शिझान खान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता शिझानच्या कुटुंबियांनीही एक पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. या पत्रकार परिषदेत शिझानच्या बहिणी फलक आणि शफक नाज यांनी शिझान आणि तुनिषा यांचा ब्रेकअप झालाच नव्हता असं वक्तव्य केलं होतं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता त्याच वक्तव्यावर स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ शेअर करत शिझानची बहीण फलकने यु-टर्न घेतला आहे.
पत्रकार परिषदेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शीजानची बहीण शफाक म्हणताना दिसतेय की, “प्रत्येकाचे नाते असते, प्रत्येकाचे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असतात, पण जर कोणी मानसिक तणावाशी संघर्ष करत असेल, डिप्रेशनमध्ये असेल तर आपण त्याला समजून घेतले पाहिजे.” यानंतर जेव्हा ब्रेकअपचा प्रश्न विचारला केला जातो, तेव्हा फलक नाज मध्येच ओरडते, की ब्रेकअप झालंच नव्हतं. फलकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रश्न विचारताना दिसत आहेत. याशिवाय, नेटकरी शिझानने कस्टडीदरम्यान ब्रेकअप झाल्याचं म्हटलं होतं याची आठवण करून देत, भाऊ आणि बहीण वेगवेगळे दावे का करत आहेत, असा प्रश्न विचारताना दिसत आहे.
आणखी वाचा- “अम्मा तुम्ही माझ्यासाठी…” शिझान खानच्या आईसाठी तुनिषा शर्माने रेकॉर्ड केलेली व्हॉईस नोट व्हायरल
सोशल मीडियावर सुरू असलेला हा गोंधळ लक्षात घेता शिझानच्या बहिण फलकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “ब्रेकअप झालं की नाही हा प्रश्न खूप फिरवून विचारला गेला होता, म्हणून मी पुन्हा सांगतोय की जेव्हा पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा आम्ही म्हणालो होतो, की ब्रेकअप दोघांच्या संमतीने झालं होतं. ज्यात कोणाच्याही बाजूने भांडण किंवा वाद झाले नाही. पत्रकार परिषद सुरू असताना खूप प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे.
आणखी वाचा- “आईनेच तुनिषा शर्माचा गळा दाबला होता, तिला पैसेही…” शिझान खानच्या कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा
दरम्यान २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मुंबईत ‘अली बाबा-दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाने तिचा सहकलाकार शिझानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. यानंतर शिझानवर अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर पोलिसांनी शिझानला अटक केली होती. त्यात न्यायालयाने शिझानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.