अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येला एक आठवडा उलटून गेला आहे. तुनिषाने २४ डिसेंबरला मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरच मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येस तिचा सहकलाकार व बॉयफ्रेंड शिझान खान जबाबदार असल्याचा आरोप अभिनेत्रीच्या आईने केला. दरम्यान निषाच्या आईने पत्रकार परिषद घेत शिझानवर विविध आरोप केले आहेत.
आणखी वाचा – शिझानची सिक्रेट गर्लफ्रेंड, तुनिषाची गाडी अन्…” अभिनेत्रीच्या आईचे शिझानसह कुटुंबियांवर धक्कादायक आरोप
आता शिझानचे वकील यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिझानच्या वकिलाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “सध्या त्याची मानसिक स्थिती काय आहे हे तुम्ही आणि मी समजू शकत नाही. तीन दिवसांपूर्वी तळोजा जेलमध्ये एकाने आत्महत्या केली.”
“या प्रकरणानंतर काऊंसिलिंग विथ सिक्युरिटीची आम्ही मदत मागितली आहे. जेणेकरून तो एकटा पडणार नाही. काऊंसिलिंगच्या आधारे शिझानवर नजर ठेवता येईल.” यानंतर काऊंसिलिंग विथ सिक्युरिटीची तुम्ही मदत मागितली तर शिझान आत्महत्येपर्यंत पाऊल उचलू शकतो असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्नही शिझानच्या वकिलांना विचारण्यात आला.
यावेळी ते म्हणाले, “ज्या मुलाने संपूर्ण आयुष्यामध्ये कधीच पोलिस व कोर्ट पाहिलं नाही. अचानक संपूर्ण मीडियाने प्रश्नचिन्ह टाकून त्याच्याबाबात जे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्याची माहिती माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक आहे.” आता तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे येत्या काही दिवसांमध्ये समजेल.