तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी तिचा को-स्टार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी तुनिषाच्या आईने पत्रकार परिषद घेऊन शिझानवर अनेक गंभीर आरोप केले होते, आता शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या आईवर तिच्या मुलीला फिरण्याची इच्छा असताना काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. तसेच तुमची मुलगी तर गेली आता आमच्या मुलानेही आत्महत्या करावी, असं तुम्हाला वाटतंय का? असा प्रश्न शिझानच्या आईने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिझानची बहीण म्हणाली, “तुनिशाबरोबर माझं बहिणीसारखं नातं होतं. तुनिषाचा हिजाब घातलेला फोटो शोमधील आहे. जेव्हा आपण पौराणिक कथांवर आधारीत शो करतो तेव्हा आपण हिंदी शिकतो. भाषेचा धर्माशी काय संबंध? कोणतीही भाषा बोलणे म्हणजे धर्मांतर करणे नव्हे. धर्म वैयक्तिक आहे. आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. तुम्ही धर्मावर अडकलात, पण इथे प्रश्न मानसिक आरोग्याचा आहे. तुनिषाचा हिजाब घातलेला फोटो सेटवरील आहे. सीन दरम्यान तुनिषाने हिजाब परिधान केला होता. त्याच दृश्याचा हा फोटो आहे. सेटवर गणपतीचे सेलिब्रेशन सुरू होते.”

Bigg Boss 16: अंकित गुप्ताने सलमान खानवर केली टीका, प्रियांकाची बाजू घेत म्हणाला, “कोणतंही कारण…”

पुढे ती म्हणाली, “मी तुनिषाच्या वाढदिवसाचा प्लॅन केला होता. तिच्या आईला याची माहिती होती. तुनिषा आमच्याबरोबर वेळ घालवायला आवडायचं. तसेच कोणावरही जबरदस्ती करून टॅटू बनवता येत नाही. टॅटू काढणे ही तिच्या बकेट लिस्टमधील एक गोष्ट होती. तिची आई सर्व गोष्टी रंगवून सांगत आहे. खरं तर मानसिक स्वास्थ्य सोडून तुम्ही सर्व काही बोलत आहात. तुनिषाची आई तिची काळजी घेऊ शकत नव्हती. तुनिषाला काम करायचं नव्हतं. तिला फिरायचं होतं. आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही तिला पाच महिने खूप आनंद दिला. पण ती आमच्याबरोबर असताना तिची आई तिला वारंवार फोन करत असे. रागाच्या भरात तुनिषा तिचा फोन फेकायची. तुनिषाची आई तिला कामासाठी बळजबरी करायची. तिला शूटला जायचं नव्हतं. तिला कधीच आईचं प्रेम मिळालं नाही. ती गेल्या १५ दिवसांपासून खूप अस्वस्थ होती. अशा परिस्थितीत सेटवर तिच्यासोबत येणं ही तिच्या आईची जबाबदारी नव्हती का?” असा प्रश्नही तिने उपस्थित केला.

तुनिषा शर्मा प्रकरणात अटकेत असलेल्या शिझान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझा…”

“तुनिषाच्या आईला तिचे शिझानबरोबरचे नाते नको होते. तुनिषाचं हे पहिलं रिलेशनशिप नव्हतं. याआधी तिचे दोन रिलेशनशिप झालेत. पण ती कधीच कोलमडली नाही. ती शिझान आणि आम्हाला गेल्या ५ महिन्यांपासून ओळखत होती. शिझान आणि तुनिशाला करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. दोघांचं ब्रेकअप झालंच नाही. त्यामुळे तो आरोप खोटा आहे. शिझानची कोणतीही सिक्रेट गर्लफ्रेंड नाही. तिच्या आईचे आरोप खळबळजनक आहेत. ब्रेकअपच्या १५ दिवसानंतर कोण आत्महत्या करतं? तिच्या आईच्या मनात येतं, ते ती बोलतेय. तसेच शिझानने ब्रेकअपबद्दल वय आणि धर्माचं कोणतंही कारण दिलेलं नाही, या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत,” असंही त्याच्या बहिणीने सांगितलं.

कोरेगाव भीमा शौर्य दिन दुर्लक्षित केला म्हणणाऱ्याला केतकी चितळेचे उत्तर, म्हणाली “मी धर्मद्रोही…”

तुनिषाला रुग्णालयात मिनिटे उशीर नेल्याचे आरोप शिझानच्या कुटुंबीयांनी फेटाळले.त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नसल्यानेच हा मुद्दा उपस्थित केला जात आहे, असं ते म्हणाले. “तुनिषाच्या आईने कबुली दिली होती की ती आपल्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही. तुनिषाच्या नैराश्याचे कारण तिच्या बालपणातील आघात होते. तुनिशाला जबरदस्ती काम करायला लावलं नसतं, तर हे घडलं नसतं. तिला ब्रेक दिला असता आणि तिच्यावर वेळीच उपचार झाले असते तर आज ती आमच्यासोबत असती. तुनिषा फक्त २० वर्षांची होती आणि तिचं मन एखाद्या १० वर्षाच्या मुलासारखं होतं. तुनिषाला शिकायचं होतं. खरं तर तिच्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला काम करायला भाग पाडलं. फक्त पैशांसाठी मुलीचा वापर केला. शिझान निर्दोष आहे, आम्ही तुनिषाला कधीच एकटं सोडलं नाही, पण तिच्या आईनेच मुलीच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं,” असे गंभीर आरोप शिझानची बहीण फलक नाजने केले आहेत.

शिझानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “२४ डिसेंबरला तुनिषा शूटिंगसाठी एकटीच आली होती. तुनिषा सकाळपासून अस्वस्थ होती. तिने व शिझानने एकत्र वेळ घालवला, त्यांनी गाणी ऐकली, नंतर शिझान सेटवर सीन शूट करण्यासाठी गेला आणि इकडे तुनिषाने आत्महत्या केली, असा दावा शिझानच्या कुटुंबाने केला. त्यांनी तुनिषाच्या मृत्यूसाठी तिच्या आईलाच जबाबदार धरलं आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma death case sheezan khan mother sisters falak naaz shafaq naaz press conference allegations on vanita sharma hrc