टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेच्या सेटवर तिने मेकअपरुममध्येच गळफास घेतला. दरम्यान तुनिषाचा बॉयफ्रेंड व या मालिकेमधील तिचा सहकलाकार शीझान खानवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. तुनिषा व शीझान या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. आता या मालिकेबाबतच एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Tunisha Sharma Suicide : धर्म आणि वय नाही तर ‘या’ कारणामुळे केलं तुनिषाशी ब्रेकअप, शिझानचा पोलिसांसमोर खुलासा

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Central government notice to Netflix after controversy over IC814 web series
‘नेटफ्लिक्स’ला केंद्र सरकारची नोटीस; ‘आयसी८१४’वेबमालिकेवरून वादानंतर कारवाई
Vasai, BJP leader, vadhavan port, fishermen,
वसई : वाढवण बंदराच्या विरोधात भाजप नेत्याच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमारांमध्ये संभ्रम
satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन
Kolkata and Badlapur Rape case
Kolkata and Badlapur Case : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणात फरक काय? गुन्हेगाराला शिक्षा मिळाली तरी गुन्हे थांबतील?

‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’मध्ये यापुढे तुनिषाची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न होता. शिवाय घडलेल्या प्रकारानंतर शीझान मालिकेमध्ये काम करताना दिसणार का? अशीही चर्चा सुरू होती. पण मालिकेच्या निर्मात्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ भाग एक लवकरच बंद होणार आहे.

‘आजतक’च्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’च्या पहिल्या भागाचे काही एपिसोड आधीच चित्रीत करून ठेवले होते. सध्या हेच भाग प्रदर्शित केले जातील. त्यानंतर ही मालिका बंद करण्यात येईल. काही दिवसांच्या ब्रेकनंतर ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’चा दुसरा भाग सुरू करण्यात आली.

आणखी वाचा – “हा चुकीचा ट्रेंड…” तुनिषा शर्मा प्रकरणावर FWICEच्या अध्यक्षांचं स्पष्ट मत; म्हणाले, “तिच्या आत्महत्येनंतर मालिकेचे निर्माते…”

मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये मात्र शीझान खान नसणार हेही स्पष्ट झालं आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या भागामध्ये नवे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. नव्या मुख्य कलाकारांना या मालिकेच्या दुसऱ्या भागामधून पुन्हा लाँच करण्यात येणार आहे. म्हणजेच शीझानचा मालिकेमधून पत्ता कट झाला आहे.