टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर तीन दिवसांनी तुनिषच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाला शेवटचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय व टीव्ही जगतातील कलाकार उपस्थित होते. तुनिषाला शेवटचा निरोप देताना तिच्या आईला अश्रू अनावर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुनिषा आत्महत्या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शीझान खानची पोलीस चौकशी करत आहेत. तुनिषा शर्मा आणि शिझान खान मागच्या ३-४ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शिझानने ब्रेकअप केल्यामुळे तुनिषा नैराश्यात होती. त्यातूनच आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तसेच त्याचे इतर मुलींशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तुनिषाच्या अंत्यसंस्कारासाठी शीझान खानची आई व बहीणही उपस्थित होते.

हेही वाचा>> तुनिषा शर्माबाबत पोलिसांनी विचारल्यावर शीझान खानला कोसळलं रडू; नेमकं काय घडलं?

हेही पाहा>> Photos: मेकअप रुम ते मालिकेचा सेट; शीझान खानने शेअर केलेले तुनिषा शर्माबरोबरचे ‘ते’ फोटो

तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma funeral mom vanita sharma gets emotional at daughter last rituals kak