‘अलीबाबा’ या मालिकेच्या सेटवर सगळं काही सुरळीत सुरू असताना एक विचित्र घटना घडली. मालिकेमध्ये काम करणारी २० वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने मेकअपरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. बॉयफ्रेंड व अभिनेता शीझान खानशी तिचं ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तुनिषाच्या जाण्याने मात्र तिची आई पुरती कोलमडून गेली आहे.
२४ डिसेंबरला (शनिवारी) तुनिषाच्या मृत्यूची बातमी समोर येताच सगळ्यांना दुःखद धक्का बसला. तुनिषाचे कुटुंबियही खचून गेले आहेत. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार २६ डिसेंबरच्या (सोमवार) रात्री तुनिषाला पाहण्यासाठी तिची आई रुग्णालयामध्ये पोहोचली.
पाहा व्हिडीओ
तुनिषाला पाहताच तिची आई मात्र बेशुद्ध पडली. रुग्णालयामधून बाहेर येतानाचा तुनिषाच्या आईच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुनिषाच्या घरातील इतर मंडळी तिच्या आईला रुग्णालयामधून बाहेर आणत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
आणखी वाचा – मुलाला कडेवर घेत सुप्रसिद्ध अभिनेत्रीला नवऱ्याने केलं लिपलॉक, फोटो पाहताच नेटकरीही भडकले
तुनिषाच्या आईचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान तुनिषाला फसवल्याचा आरोप तिच्या आईने शीझानवर केला आहे. दुसऱ्या मुलीबरोबरही त्याचे प्रेमसंबंध असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. “याच महिन्यात शूटिंगदरम्यान सेटवरच तुनिषाने शीझानचा मोबाईल हातात घेतला होता. तेव्हा चुकून तिने त्याचा मोबाईल तपासला. शीझान एका मुलीशी डेटिंगबाबत बोलत असल्याचं चॅट तिला सापडले. ते चॅट वाचून तुनिषाला धक्का बसला”, असं तिची आई म्हणाली.