वसई- टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वालीव पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचासहकलाकार मोहम्मद शिझान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. शिझानने प्रेमसंबध तोडल्याने निराश झाल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती.

तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड शिझान खान पोलिसांनी केली अटक; अभिनेत्रीने त्याच्याच खोलीत घेतलेला गळफास

तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्‍यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती.

तुनिषाने शर्माने बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या? नातेवाईकांच्या आरोपांमुळे खळबळ

मीरा रोड येथे राहणार्‍या तुनिषाचे अभिनेता मोहम्मद शिझान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याने प्रेमसंबंध तोडल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशीरा अटक केली, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.

तुनिषा शर्माचा कथित बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान कोण आहे? मालिकेत साकारतोय ‘अलिबाबा’ची भूमिका

पोलीस सध्या सेटवर उपस्थित सर्वांची चौकशी करणार आहेत. अभिनेत्री गर्भवती असल्याची चर्चा होती, त्याबद्दल विचारलं असता असून शवविच्छेदन सुरू असल्याची माहिती जाधव यांनी दिली. तिचे पार्थिव शवविच्छेदनासाठी नालासोपरा रुग्णालयात नेण्यात आले आहे.