तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी नेहमी नवी माहिती समोर येत आहे. तिचा सहकलाकार व एक्स बॉयफ्रेंड शिझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. तुनिषा तसेच शिझानच्या कुटुंबियांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आता तुनिषाने शिझानच्या आईसाठी रेकॉर्ड केलेली व्हॉईस नोट समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “शिझान-तुनिषाचं ब्रेकअप झालंच नाही” अभिनेत्याच्या बहिणीचा दावा; तुनिषाच्या आईवर केले गंभीर आरोप

शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत तुनिषा शर्माची एक व्हॉईस नोट सगळ्यांसमोर आणली. तिने शिझान खानच्या आईसाठी व्हॉईस नोट रेकॉर्ड केली होती. या व्हॉईस नोटमध्ये तुनिषा शिझानच्या आईवर तिचं किती प्रेम आहे हे बोलताना दिसत आहे.

काय म्हणाली होती तुनिषा शर्मा?
तुनिषाने या व्हॉईस नोटमध्ये म्हटलं की, “अम्मा तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात. तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहात हे तुम्हालाही माहित नसेल. म्हणूनच तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करावी असं वाटतं. पण मला स्वतःलाच काय होत आहे हे मलाच ठाऊक नाही.”

तुनिषाची ही व्हॉईस नोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या आईवर तिच्या मुलीला फिरण्याची इच्छा असताना काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. तसेच तुमची मुलगी तर गेली आता आमच्या मुलानेही आत्महत्या करावी, असं तुम्हाला वाटतंय का? असा प्रश्न शिझानच्या आईने केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tunisha sharma record voice note for sheezan khan mother goes viral on social media see details kmd