सध्या संपूर्ण देशभरात अभिनेत्री तुनिषा शर्माचं आत्महत्या प्रकरण गाजतंय. २४ डिसेंबरला तुनिषाने ‘अलिबाबा’ मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाचा कथित बॉयफ्रेंड शिझान खानला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणात रोज काही ना काही नवे खुलासे होताना दिसत आहेत. एकीकडे या प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरू असताना तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी शिझान खानबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला वाटते हे १०० टक्के लव्ह जिहादचे प्रकरण आहे. पोलिसांनी याबाबत तपास करावा, अशी माझी मागणी आहे. तुनिषाच्या मृत्यूचा प्रत्येक दृष्टीकोनातून तपास व्हायला हवा, अशी आमची मागणी आहे. तुनिषाने आत्महत्या केली की तिचा मृत्यू अन्य कशामुळे झाला, याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही,” असं तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर आता तुनिषाच्या हिजाब घालण्यावरून त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा- तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिझानचा मोठा खुलासा, म्हणाला “माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी…”

‘इंडिया टुडे’शी बोलताना तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याची शक्यता वर्तवतानाच तुनिषाने हिजाब घालायला सुरुवात केल्याचंही म्हटलं आहे. ते म्हणाले, “शिझान खानला भेटल्यानंतर तुनिषा हळूहळू बदलत गेली. तिच्यात बराच बदल झाला होता आणि नंतर तिने हिजाबही घालायला सुरुवात केली होती.”

याशिवाय त्यांनी पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कोणताही सखोल तपास न करता पोलीस तुनिषाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला, असे कसे म्हणू शकतात. पोलिसांनी अगोदर या प्रकरणाचा सखोल तपास करायला हवा. त्यानंतर तुनिषाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की लव्ह जिहाद तिच्या मृत्यूचे कारण होते हे समजेल,” असे पवन शर्मा म्हणाले. पोलिसांनी तुनिषाच्या कुटुंबियांचा अद्याप जबाब घेतला नसल्याचाही आरोप पवन शर्मा यांनी केला.

आणखी वाचा- Tunisha Sharma Suicide : धर्म आणि वय नाही तर ‘या’ कारणामुळे केलं तुनिषाशी ब्रेकअप, शिझानचा पोलिसांसमोर खुलासा

दरम्यान तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.