‘अलिबाबा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली आहे. अवघ्या २० वर्षांच्या तुनिषाने मेकअप रुममध्येच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने कथित बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर १५ दिवसांनी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तिचा मित्रपरिवार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपलं दुःख व्यक्त करताना दिसत आहे. आता तिची मैत्रीण रीम शेखने एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

तुनिषा शर्मा आणि रीम शेख एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. तुनिषाच्या आत्महत्येनंतर रीमने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तुनिषाबरोबरचे ३ फोटो शेअर केले आहेत. ज्यात दोघीही खूप खुश आणि हसताना दिसत आहेत. रीम शेखने आपल्या पोस्टमधून तुनिषा शर्माची माफी मागितली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा- प्रेमभंग झाला अन् १० दिवसांपूर्वीच…; तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

रीमने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिलं, “मला माहीत आहे की या जगाने तुझ्याबरोबर जे काही केलं ते चांगलं केलेलं नाही. मला माफ कर. आशा करते की तुझ्या आत्म्यास शांती मिळो.” आपल्या या पोस्टमध्ये रीम शेखने #bffsatfirstsight #loversatfirstsight असे दोन हॅशटॅग वापरले आहे. रीमच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत दुःख व्यक्त केलं आहे.

दरम्यान तुनिषा शर्माने ‘अलिबाबा’ शोच्या सेटवरच मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. सहकलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर आलेल्या डिप्रेशनमध्ये तुनिषाने हे पाऊल उचलल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. तुनिषाने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं. तसेच ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिकाही तिने साकारली होती.

Story img Loader