टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. २० वर्षीय अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड शीझान खान पोलिसांच्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे.

शीझान व तुनिषा गेल्या चार-पाच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शीझानने ब्रेकअप केल्यामुळे नैराश्यातून तुनिषाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. त्यानंतर आयपीसी ३०६ अंतर्गत शीझानला अटक करण्यात आली. शीझानने पोलीस चौकशीत अनेक खुलासे केले आहेत.

Crime News
Crime News : होमिओपॅथी डॉक्टरचे भयानक कृत्य! गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांचा मृतदेह ४ महिने घरात दडवला, कुजू नयेत म्हणून…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
pimpri chinchwad city 6 suicides in a day
Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सहा आत्महत्या
baba siddiquie murder plan
Baba Siddhique Murder case: ‘असा’ रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; हल्लेखोरानं कबुलीजबाबात सांगितला संपूर्ण घटनाक्रम!
man killed his wife and son and create faked suicide
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
Mohit Kambo
बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव, हत्येच्या काही तास आधी चर्चा; मोहित कंबोज यांचं कथित आरोपांवर स्पष्टीकरण
On tuesday morning police found dead body of woman at Dream Mall on lbs road in Bhandup West
भांडुपमधील ड्रीम मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

ब्रेकअपबाबत भाष्य: शीझानने चौकशीत तुनिषाबरोबर ब्रेकअप करण्यामागचं कारण पोलीस चौकशीत उघड केलं. आधी त्याने धर्मामुळे तुनिषाशी ब्रेकअप केल्याचं सांगितलं. नंतर जबाब बदलून श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे ब्रेकअप केलं असल्याचं शीझान म्हणाला.

हेही वाचा>> सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याच्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, म्हणाली “पुढच्या वेळी…”   

डबल डेटिंगबाबत खुलासा: शीझान तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असतानाच इतर मुलींनाही डेट करत असल्याचा दावा तिच्या आईने केला होता. परंतु, दुसऱ्या मुलीला डेट करत असल्याच्या आरोपाचं त्याने खंडन केलं आहे. तरीही शीझानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडबाबत पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांना १७ जणांचा जबाब नोंदवला: तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांचा जबाब नोंदवला आहे.

चौकशीदरम्यान शीझानला कोसळलं रडू: पोलीस चौकशीदरम्यान तुनिषा शर्माच्या अंत्यसंस्काराला जायचं का? असं विचारताच शीझानला रडू कोसळलं.

हेही वाचा>> आत्महत्येच्या तीन दिवसांनंतर तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार; लेकीला निरोप देताना आईला अश्रू अनावर

शीझानने अनेक वेळा बदलला जबाब: चौकशीदरम्यान तुनिषाने अनेकदा त्याचा जबाब बदलल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. अजूनही त्याने तुनिषाशी ब्रेकअप करण्यामागचं नेमकं कारण सांगितलेलं नाही.

तुनिषा शर्मावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. शीझान खानची आई व बहिणही तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.

Story img Loader