तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. तिचा सहकलाकार व एक्स बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. दरम्यान तुनिषाच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत.

आणखी वाचा – “अम्मा तुम्ही माझ्यासाठी…” शिझान खानच्या आईसाठी तुनिषा शर्माने रेकॉर्ड केलेली व्हॉईस नोट व्हायरल

पत्रकार परिषदेदरम्यान शिझानच्या कुटुंबीयांसह त्याचे वकीलही तिथेही उपस्थित होते. यावेळी तुनिषाच्या आईवर त्याच्या कुटुंबीयांनी धक्कादायक आरोप केले आहेत. “तुनिषाच्या आईने तिचा गळा दाबला होता. ही जेव्हा घटना घडली त्यादरम्यान ती ज्या मालिकेमध्ये काम करत होती त्या मालिकेतील दिग्दर्शकालाही तिने हे सांगितलं होतं.” असे आरोप तुनिषाच्या आईवर करण्यात आले आहेत.

“तुनिषा तिच्या आईचे मित्र संजीव कौशल यांना घाबरायची. या सगळ्या गोष्टींमुळे ती तणावाखाली असायची. शिवाय याचकारणामुळे ती तिची मैत्रीण कंवर ढिल्लोंबरोबर तीन महिने राहिली.” असेही आरोप शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या आईवर केले आहेत.

आणखी वाचा – “कोणत्याही कलाकाराने यापुढे…” प्रसाद जवादेच्या ‘त्या’ पोस्टनंतर ‘बिग बॉस मराठी’वर भडकले प्रेक्षक, प्रार्थना बेहरेनेही केली कमेंट

तुनिषाच्या कामाचे व मेहनतीचे पैसे तिची आई स्वतःकडे ठेवायची. तुनिषाला ती पैसे देण्यासही नकार द्यायची. शिवाय तुनिषाने आईकडे पैसे मागितल्यास तिला अनेक प्रश्न विचारले जायचे. असेही आरोप शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या आईवर केले आहेत. आता शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहावं लागेल.

Story img Loader