छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. मालिकेच्या सेटवरच तिने गळफास लावून जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास घेतला. या प्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहे. तुनिषा शर्माप्रकरणी रविवारी दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी रविवारी (२५ डिसेंबर) विविध खुलासे समोर आले आहेत. यावेळी पोलिसांनी विविध गोष्टींचा खुलासा केला. तुनिषाचा मृत्यू नेमका कसा झाला? तिच्या शवविच्छेदन अहवालात काय? ती गर्भवती होती की नाही? तिच्या मृत्यूचे कारण काय? तिच्या प्रियकराला किती दिवसांची कोठडी मिळाली? याबद्दल मोठे खुलासे समोर आले आहेत. गेल्या २४ तासात या प्रकरणाचे संपूर्ण चित्रच पालटल्याचे पाहायला मिळत आहे.
तुनिषा शर्माच्या मृत्यूशी संबंधित १२ मोठे खुलासे
- मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा ही टीव्ही शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होती. तुनिषा शर्मा आणि शिझान खान यांचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांचा १५ दिवसांपूर्वी ब्रेकअप झाला होता. त्यानंतर तुनिषाने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तिचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाला. तुनिषाचा ब्रेकअप झाल्याने ती निराश झाली होती. त्याच नैराश्यात तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
TV actor Tunisha Sharma death case: He (Sheezan Khan) has been taken into police custody for 4 days. Police will investigate from all angles.Cause of death is hanging. Her mother said she hanged herself due to her breakup. She hanged herself with a bandage: ACP Chandrakant Jadhav pic.twitter.com/nZjcRRTHAx
— ANI (@ANI) December 25, 2022
- तुनिषा शर्माचे मृत्यूनंतर रात्री उशिरा तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात आणण्यात आला. पहाटे चारच्या सुमारास तुनिषाचे पोस्टमॉर्टम पूर्ण झाले. या संदर्भात पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू प्रामुख्याने श्वास गुदमरल्यामुळे झाला आहे. तुनिषा गरोदर असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखमी आढळलेली नाही, असेही यात म्हटले आहे.
- तुनिषा शर्मा ही टीव्ही शोमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होती. तुनिषा शर्मा आणि शिझान खान यांचे प्रेमसंबंध होते. तुनिषाने तिच्या आईला तिच्या ब्रेकअपबद्दलची कल्पना दिली होती. शिझानबरोबर ब्रेकअप झाल्याने मी फार दु:खी आहे. तो माझ्याशी बोलत नाही, असे तिने तिच्या आईला सांगितले होते. तिच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत याबद्दल नमूद केले आहे.
- मुंबई पोलिसांनी शनिवारी (२४ डिसेंबर) तुनिषाच्या आईचा जबाब आणि तक्रारीच्या आधारे शिझानविरुद्ध आयपीसी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. शिझानने तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आईने केला होता. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत शिझानला अटक केली. त्याचा मोबाईलही जप्त केला.
- रविवारी दुपारी शिझानला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने शिझानला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता चार दिवस तो पोलीस कोठडीत असणार आहे. यावेळी त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.
- या संपूर्ण प्रकरणानंतर आता तिच्या काकांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिझानचे एका दुसऱ्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. जर त्या मुलीने आत्महत्या केली असेल, तिचा जीव गमावला असेल तर त्याचे काही तरी कारण निश्चितच असेल. यात कोणाची तरी चूक नक्कीच असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात शिझानचे अन्य कोणत्याही मुलीशी अफेअर नव्हते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
- तुनिषाने आत्महत्येच्या काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तिचे केस नीट करताना दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ शूटींगदरम्यानचा आहे. आत्महत्येच्या काही तास पूर्वी तिने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला होता. मग अचानक असं काय झालं की तुनिषाने आत्महत्या केली?
- तुनिषाच्या मृत्यूनंतर, पोलिसांच्या टीमने अलीबाबा मालिकेच्या सेटवर युनिट सदस्यांची चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान तुनिषाने तिचा सहकलाकार शिझानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले. शिझान हा त्याचा सीन संपल्यानंतर जेव्हा मेकअप रुममध्ये पोहोचला तेव्हा त्याने दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्याने मेकअप रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी तुनिषाला अशा अवस्थेत पाहून त्याला धक्का बसला. तुनिषाने शिझानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिचा मृत्यू झाला होता.
- तुनिषा शर्मा हिला काही दिवसांपूर्वी हाताला दुखापत झाली होती. यामुळे तिच्या हाताला बांधलेल्या बँडेज पट्टी लावण्यात आली होती. याच बँडेज पट्टीचा वापर तिने गळफास घेण्यासाठी केला.
- शिझान खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण पोलिसांकडे अद्याप कोणतेही पुरावे नाहीत. त्याच्यावर फक्त आरोप केले जात आहेत. तो पूर्णपणे निर्दोष आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
- तर दुसरीकडे शिझान खानची बहीण पलक खान हिनेही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या भावाच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तो निर्दोष आहे. याप्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, असे तिने ‘आज तक’शी बोलताना सांगितले. सध्या आमच्या संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
- तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी तिच्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यावेळी ते म्हणाले, तुनिषा शर्माला १० दिवसांपूर्वी Anxiety Attack आला होता. त्यानंतर तुनिषाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असा खुलासा त्यांनी केला.
Sheezan Khan was in touch with many girls, says actor Tunisha's kin
— ANI Digital (@ani_digital) December 25, 2022
Read @ANI Story | https://t.co/fRDoNvTQ4f#SheezanKhan #TunishaSharma #Mumbai #SheezanMohammadKhan pic.twitter.com/1po5N6Ib2G
दरम्यान तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वयाच्या २० व्या वर्षी स्व:बळावर टेलिव्हिजन इंडस्ट्रीत इतकं मोठं स्थान मिळवलेल्या या अभिनेत्रीने अचानक आत्महत्येचा पर्याय का निवडला? तिने आत्महत्येसाठी तिचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड मोहम्मद शिझानची मेकअप रूम का निवडली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहेत.