अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत तुनिषा ही मुख्य भूमिका साकारत होती. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आता या प्रकरणी शिझान खानच्या कुटुंबियांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होताना दिसत आहे. तिच्या मृत्यूनतंर अभिनेत्रीच्या आईने ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली होती. शिझान खानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे.”
आणखी वाचा : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला कोठडी, श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू अन्…; गेल्या २४ तासात नेमकं काय घडलं?

Protest After Somnath Suryawanshi Custodial Death.
Somnath Suryawanshi : “त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे…”, सोमनाथ सुर्यवंशीच्या व्यथित आईची प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Atul Subhash suicide case wife arrested
Atul Subhash suicide case: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक
allu arjun shah rukh khan
अल्लू अर्जुनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात का घेतले शाहरुख खानचे नाव? जाणून घ्या
Atul Subhash
Atul Subhash Suicide : अतुल सुभाषच्या पत्नीला नोटीस, तीन दिवसांत हजर होण्याचे आदेश!
varun dhawan reaction on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया, अभिनेता म्हणाला, “घडलेली घटना दुर्दैवी, पण त्याचा दोष…”
High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”

यानंतर पोलिसांनी शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर रविवारी दुपारी त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने शिझानला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करणार आहेत.

या प्रकरणानंतर आता शिझान खानची बहीण पलक खान हिने प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या भावाच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तो निर्दोष आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, असे तिने ‘आज तक’शी बोलताना सांगितले. सध्या आमच्या संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, असेही ती म्हणाली.

आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर

दरम्यान तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वयाच्या २० व्या वर्षी स्व:बळावर टेलिव्हिजन इंडस्ट्रीत इतकं मोठं स्थान मिळवलेल्या या अभिनेत्रीने अचानक आत्महत्येचा पर्याय का निवडला? तिने आत्महत्येसाठी तिचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड मोहम्मद शिझानची मेकअप रूम का निवडली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहेत. 

Story img Loader